आज पूजेवेळी या पद्धतीनं करा ‘श्री हरि स्तोत्रम्’ पठण; एकादशी व्रताचे मिळेल पुण्य – News18 लोकमत

[ad_1]

मुंबई, 13 जुलै : हिंदू कॅलेंडरनुसार, कामिका एकादशीचा सण दरवर्षी आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला साजरा केला जातो. आज 13 जुलै रोजी आषाढ महिन्यातील कामिका एकादशीचे व्रत केले जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी जगाचे रक्षणकर्ते भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधी-नियमांनुसार पूजा केली जाते आणि कामिका एकादशीचे व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. तुम्हालाही भगवान श्री हरी विष्णूचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा. यासोबतच कामिका एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णू स्तुतीचे पठण करावे. ज्योतिषाचार्य पंडित कल्की राम सांगतात की, कामिका एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णू स्तुतीचे पठण केल्याने जीवनातील सर्व दु:ख आणि संकटे दूर होतात, जाणून घेऊया काय आहे श्री हरी स्तुती पाठ.

News18लोकमत


News18लोकमत

श्री हरि स्तोत्रम् जगज्जालपालं चलत्कण्ठमालं शरच्चन्द्रभालं महादैत्यकालं नभोनीलकायं दुरावारमायं सुपद्मासहायम् भजेऽहं भजेऽहं ॥ सदाम्भोधिवासं गलत्पुष्पहासं जगत्सन्निवासं शतादित्यभासं गदाचक्रशस्त्रं लसत्पीतवस्त्रं हसच्चारुवक्त्रं भजेऽहं भजेऽहं ॥ रमाकण्ठहारं श्रुतिव्रातसारं जलान्तर्विहारं धराभारहारं चिदानन्दरूपं मनोज्ञस्वरूपं ध्रुतानेकरूपं भजेऽहं भजेऽहं ॥ जराजन्महीनं परानन्दपीनं समाधानलीनं सदैवानवीनं जगज्जन्महेतुं सुरानीककेतुं त्रिलोकैकसेतुं भजेऽहं भजेऽहं ॥ कृताम्नायगानं खगाधीशयानं विमुक्तेर्निदानं हरारातिमानं स्वभक्तानुकूलं जगद्व्रुक्षमूलं निरस्तार्तशूलं भजेऽहं भजेऽहं ॥
Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास
समस्तामरेशं द्विरेफाभकेशं जगद्विम्बलेशं ह्रुदाकाशदेशं सदा दिव्यदेहं विमुक्ताखिलेहं सुवैकुण्ठगेहं भजेऽहं भजेऽहं ॥ सुरालिबलिष्ठं त्रिलोकीवरिष्ठं गुरूणां गरिष्ठं स्वरूपैकनिष्ठं सदा युद्धधीरं महावीरवीरं महाम्भोधितीरं भजेऽहं भजेऽहं ॥ रमावामभागं तलानग्रनागं कृताधीनयागं गतारागरागं मुनीन्द्रैः सुगीतं सुरैः संपरीतं गुणौधैरतीतं भजेऽहं भजेऽहं ॥
श्रावण सुरू होताच राशीनुसार करा या गोष्टी; शंभू-महादेव अडचणींमध्ये दाखवतील मार्ग
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *