आठवड्याच्या शेवटी अधिकमासातील एकादशी; पूजेचे शुभ मुहूर्त, उपवास सोडण्याची वेळ पहा – News18 लोकमत

[ad_1]

मुंबई, 25 जुलै : मलमास किंवा अधिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला कमला किंवा पद्मिनी एकादशी म्हणतात. कमला एकादशी दर तीन वर्षांनी एकदा येते, कारण अधिक मास दर तीन वर्षांनी येत असतो. मलमास पडतो तेव्हा त्या वर्षी 24 ऐवजी 26 एकादशींचे व्रत होते. मलमासातील शुक्ल पक्षातील एकादशीला कमला एकादशी आणि कृष्ण पक्षातील एकादशीला परमा एकादशी म्हणतात. एखाद्याची विशेष इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यांनी कमला एकादशीचे व्रत करावे. कमला एकादशी व्रताचे तीन प्रमुख फायदे आहेत. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांनी या एकादशीची सविस्तर माहिती दिली आहे. कमला एकादशी व्रताचे फायदे – 1. कमला एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या कामातील यश आणि कीर्ती वाढते. त्यांच्या कामांचे कौतुक होते. तो आपल्या कुळाचा मान-मूल्य वाढवतो, अशी श्रद्धा आहे. 2. जो व्यक्ती कमला एकादशीचे व्रत करतो, त्याची पापे विष्णूच्या कृपेने नष्ट होतात आणि मृत्यूनंतर त्याला वैकुंठामध्ये स्थान मिळते, असे मानले जाते. 3. जे निपुत्रिक आहेत त्यांनी कमला एकादशीचे व्रत करावे. त्याच्या पुण्य प्रभावामुळे पुत्र जन्माला येतो, असे मानले जाते.

News18लोकमत


News18लोकमत

पौराणिक कथेनुसार, महिष्मती पुरीचा राजा कृतवीर्य याला 1000 राण्या होत्या, परंतु एकीकडूनही पुत्र प्राप्त झाला नव्हता. कृतवीर्य राजाने गंधमान पर्वतावर 10 हजार वर्षे घोर तपश्चर्या केली, पण त्याला पुत्रप्राप्ती झाली नाही. तेव्हा अनुसूयाने राणी कमलाला सांगितले की, मलमास शुक्ल पक्षातील एकादशी व्रताचे पालन केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. श्रीहरीच्या कृपेने तुला पुत्रप्राप्ती होईल. यानंतर राणी कमला मलमास येण्याची वाट पाहू लागली. मलमास शुक्ल पक्षातील एकादशीला व्रत पाळले. रात्रीच्या जागरणानंतर व्रत पार पडले. तिच्या व्रताने भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि तिला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला. राणी गरोदर राहिली आणि तिला मुलगा झाला. कमला एकादशीचे व्रत संतती वाढीसाठीही पाळले जाते.
रॉयल लाइफ जगण्याचे शौकीन असतात या राशीची माणसं; स्वप्न सत्यातही उतरवतात
पद्मिनी एकादशीचे व्रत कधी? यंदा पद्मिनी एकादशीचे व्रत 29 जुलै, शनिवारी आहे. या वर्षी श्रावण अधिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी शुक्रवार, 28 जुलै रोजी दुपारी 02:51 ते शनिवार, 29 जुलै रोजी दुपारी 01:05 पर्यंत आहे. उदयतिथीनुसार एकादशी शनिवारी आहे. एकादशीचा उपवास सोडण्याची वेळ – कमला एकादशी व्रताचे पारण वेळ म्हणजे उपवास सोडण्याची वेळ रविवार 30 जुलै रोजी पहाटे 05:41 ते 08:24 पर्यंत आहे.
घरात पितृदोष असेल तर असे संकेत वारंवार दिसतात; सोमवती अमावस्येला करा हे उपाय
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *