आठवड्यातले 5 दिवसच सुरू राहणार बँक, शनिवारी गेलात तर होईल नुकसान

[ad_1]

मुंबई : तुम्ही जर चुकून शनिवारी बँकेत गेलात तर तुमचं काम कदाचित होऊ शकणार नाही आणि तुम्हाला रिकाम्या हाताने परतावं लागू शकतं. याचं कारण म्हणजे आता येत्या काही दिवसांत 5 दिवसच बँका सुरू राहणार आहेत. पाच दिवसांचा आठवडा करण्यात येणार आहे. CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार आठवड्यातून 5 दिवस काम करावं लागणार आहे. पगारवाढ यासह सर्व प्रलंबित प्रश्नांवर पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक युनियन आणि बँक असोसिएशन यांच्यात 28 जुलै रोजी पहिली बैठक होणार आहे. ज्यामध्ये या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांसह निवृत्त बँकर्सना स्वस्त आरोग्य विमा देण्यावरही चर्चा होणार आहे.

News18लोकमत


News18लोकमत

बँक युनियन अनेक दिवसांपासून 5 कामकाजाच्या दिवसांची मागणी करत आहेत. सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळात 5 कामकाजी दिवसांचा नियम लागू केल्यापासून या मागणीने जोर धरला होता. कर्मचार्‍यांच्या या मागणीला अर्थ मंत्रालयाने कोणताही आक्षेप घेतला नाही आणि थेट दुजोराही दिला नाही मात्र आता यावर बैठकीत चर्चा करण्यात येणार असून निर्णय घेतला जाऊ शकतो. इंडियन बँकिंग असोसिएशनने या मागणीबाबत सरकारला प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावानुसार, बँक कर्मचार्‍यांचा दैनंदिन कामकाजाचा कालावधी 40 मिनिटांनी वाढणार आहे. वेतन मंडळाच्या सुधारणांसह अधिसूचना जारी केली जाऊ शकते. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या कलम 25 अंतर्गत अधिसूचना जारी केली जाऊ शकते. सरकारला ३१ डिसेंबरपूर्वी सर्व प्रश्न निकाली काढायचे आहेत. आठवड्यातून ५ दिवस काम करण्यास सरकारची हरकत नाही. बँकर्स वेतन सुधारणा मागील वर्षी १ नोव्हेंबरपासून होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *