उद्यापासून म्हातारा पाऊस! पुष्य नक्षत्र आणि वाहन बेडूक; पंचागानुसार असा राहील पाऊसकाळ – News18 लोकमत

[ad_1]
मुंबई, 19 जुलै : पंचाग आणि पूर्वीच्या रुढी-परंपरानुसार उद्या सायंकाळपासून म्हातारा पाऊस सुरू होत आहे. गुरुवारी सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे. गुरुवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी सायंकाळी 04 वाजून 55 मिनिटांनी सूर्याचा पुष्य नक्षत्रात प्रवेश होईल. यावेळी धनू लग्न असून वाहन बेडूक आहे, ग्रह योगांचा विचार करता या नक्षत्राचा चांगल्या प्रमाणात पाऊस होण्याची चिन्हे आहेत. परंतु, म्हणावा तसा पाऊस पडण्याची शक्यता नाही. दिनांक 20 ते 23, 27 आणि 29 ते 01 ऑगस्टला चांगला पाऊस अपेक्षित आहे, अशी माहिती पंचांगामधून सांगण्यात आली आहे. आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रथा आणि परंपरा वर्षानुवर्ष चालत आल्या आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यातील वेगवेगळ्या नक्षत्रांचा अंदाज हा परंपरेनुसार बांधला जातो. विशिष्ट नक्षत्राला सुरू होणाऱ्या पावसाला तरणा पाऊस, म्हातारा पाऊस, सुनेचा पाऊस तसंच सासूचा पाऊस असं म्हंटलं जातं. या प्रकारच्या नावांचं कारण काय आहे? हे ठाण्यातील सुप्रसिद्ध पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी सांगितलं.
News18लोकमत
गुरुवार 20 जुलै रोजी सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल. या नक्षत्रात पडणाऱ्या पावसालाच म्हातारा पाऊस, असे म्हणतात. पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांनी या पर्जन्यसूर्य नक्षत्रांना पडणाऱ्या पावसांना गमतीशीर नावं ठेवली आहेत. पुनर्वसु नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘तरणा पाऊस’ म्हणतात. पुष्य नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘म्हातारा पाऊस’ असं म्हंटलं जातं. आश्लेषा नक्षत्रातील पावसाचं ‘आसळकाचा पाऊस’ तर मघा नक्षत्रात जोरदार पाऊस पडतो. म्हणून मघा नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘सासूंचा पाऊस’ म्हणतात, अशी माहिती सोमण यांनी दिली. महाराष्ट्रील बहुतांश ग्रामीण भागात नक्षत्र आणि वाहनावरून पाऊस कसा पडला किंवा पडेल याविषयी लोक चर्चा करतात.
या जन्मतारखांची जोडी प्युअर आणि निष्ठावान पार्टनर ठरते, आनंदी जीवन जगतात
राज्यात अनेक ठिकाणी अपेक्षित पाऊस न झाल्याने दुबार पेरण्यांचे संकट आहे. जिथे पेरणी झाली आहे, तिथला शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. राज्यातील काही भागात शेतीसाठी हवा तसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच नक्षत्र बदलणार असून म्हातारा पाऊस सुरू होणार असून वाहन बेडूक आहे, या नक्षत्राकडून शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.
घरात पितृदोष असेल तर असे संकेत वारंवार दिसतात; सोमवती अमावस्येला करा हे उपाय
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
[ad_2]
Source link