एक रहस्यमयी जंगल, जेथील झाडांचे लाकूड मानले जाते अशुभ

[ad_1]

पलवल, 29 जुलै :  भारताला आध्यत्मिक केंद्र मानले जाते. येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत ज्यांना धार्मिक दृष्ट्या खूप महत्व असून यात असे देखील काही मंदिर आहेत ज्यांचा इतिहास हा रहस्यमय आहे. परंतु आज तुम्हाला अशा एका जंगलबद्दल सांगणार आहोत ज्याच्यामध्ये असलेल्या झाडांच्या लाकडांचा वापर करणे अशुभ मानले जाते. हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील पृथला येथील गावात असलेल्या करियाकी धाम मंदिराच्या जवळ हे जंगल स्थित आहे. करियाकी धाम मंदिर नावाने प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात शनी देवाची आराधना केली जाते. यामंदिरात आसपासच्या गावातील लोक देखील येऊन दर्शन घेतात आणि पूजा अर्चा करतात. मंदिराच्या समोर दर शनिवारी मोठा उत्सव साजरा केला जातो. बाबा बरखंडी दास, बाबा नरसिंह दास यांनी या मंदिरात तपस्या केली होती. भाविकांची श्रद्धा आहे की शनिवारी मंदिरात येऊन पूजा अर्चना केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.
भोपळ्याच्या लागवडीतून शेतकरी महिन्याला कमावतोय 60 हजार, जाणून घ्या किती येतो खर्च
काय आहे जंगलाचे रहस्य? मंदिराचे महंत रुपदास महाराज यांनी सांगितले की, अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.  गावात करिया नावाची मुलगी राहायची जिला भावंड नव्हते. तिच्या आई  वडिलांकडे बरीच जमीन होती. आई वडिलांच्या मृत्यूनंतर ती एकटी पडली आणि गावात जमिनीवरून वाद सुरू झाला. असे म्हटले जाते की करिया ही भगवान श्रीकृष्णाची भक्त होती. त्यानंतर त्यांना मंदिराच्या नावावर जमीन देण्यात आली आणि तेव्हापासून हे मंदिर करियाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे.

News18लोकमत


News18लोकमत

मंदिरात तपस्या करणाऱ्या नरसिंह बाबांनी सांगितले होते की, जो कोणी जंगलातून लाकूड तोडेल त्याचे कोणतेही काम यशस्वी होणार नाही. तेव्हापासून या जंगलातील लाकूड जो कोणी स्वत:च्या वापरासाठी घेतो, त्याच्यासोबत काहीतरी अनुचित प्रकार घडतो, अशी ग्रामस्थांची धारणा आहे. या जंगलातील लाकड केवळ जंगलातच वापरली जातात, जेव्हा केव्हा मंदिरत हवन किंवा भंडारा असतो तेव्हाच जंगलातील लाकडे हवनात जाळली जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *