ओरॅकल कंपनीचा कर्मचाऱ्यांना पुन्हा धक्का; शेकडो कर्मचाऱ्यांचे ऑफर्स लेटर्स घेतले परत – News18 लोकमत

[ad_1]

मुंबई, 16, जून: गेल्या वर्षीपासून जगभरातील IT कंपन्यांमध्ये ले ऑफ्स सुरु आहेत. कधी फेसबुक तर कधी गुगल तर कधी मायक्रोसॉफ्ट अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. त्यात आता अजून एका कंपनीची भर पडली आहे. नामांकित कंपनी ओरॅकलनं आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, ओरॅकल कंपनीनं आपल्या हेल्थ विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. इतकंच नाही तर त्यांना पिंक स्लिपही देण्यात आली आहे. तसंच ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे अशा कर्मचाऱ्यांना दिलेलं ऑफर लेटरही परत घेण्यात आलं आहे.
12वी पास झालात ना? मग थेट सरकारी नोकरी घ्या ना; वन विभागात तब्बल 2138 जागांसाठी मेगाभरती; घ्या Link
इतर अनेक कंपन्यांप्रमाणे, Oracle टाळेबंदीच्या या फेरीमुळे प्रभावित झालेल्या लोकांना चार आठवड्यांच्या बरोबरीने प्रत्येक वर्षाच्या सेवेसाठी एक अतिरिक्त आठवडा आणि सुट्टीतील दिवसांचे पेआउट मिळतील.
धक्कादायक! टाटांच्या ‘या’ कंपनीमध्ये नेमकं चाललंय काय? लैंगिक छळाच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ
केवळ ओरॅकलच नाही तर जगभरातील अनेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदीच्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहेत. ओरॅकलच्या ले ऑफ्समुळे जवळपास 3,000 कामगारांवर परिणाम होईल. इतकं असूनही ओरॅकल कंपनीकडून यासंबंधी अजूनही काही अधिकृत भाष्य केलं नाहीये.

News18लोकमत


News18लोकमत

काही तज्ज्ञांच्या मते लेऑफ्सचा हा ट्रेंड हे संपूर्ण वर्ष सुरु राहणार आहे. तसंच जागतिक बाजारात मंदी सुरु असल्यामुळे याचा परिणाम अनेक IT कंपन्यांवर होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *