काय सांगता! साधा बल्ब बदलण्यासाठी कंपनी देतेय 1 कोटी पगार; तरीही कोणी अप्लाय करेना; कारण वाचून व्हाल शॉक

[ad_1]
मुंबई, 14, जून: आजकालच्या काळात लाखो करोडो रुपयांचा जॉब कोणाला नको असतो. झटपट पैसे कमावण्याच्या अनेक सोयी आजकाल उपलब्ध झाल्या आहेत. लोक काहीही काम करून पैसे कमवत असतात. पण तुम्हाला असा एक जॉब माहिती आहे का? जो करण्यासाठी अमेरिकेतील एक कंपनी तब्बल एक कोटी रुपयेही द्यायला तयार आहे. पण हा जॉब करण्यास कोणी साधं अप्लाय सुद्धा करत नाही. पण का? असं काय भयानक आहे या जॉबमध्ये? जाणून घेऊया. तुम्ही म्हणाल हा जॉब खूप जास्त बुद्धीचा असेल किंवा अति हुशार व्यक्तीलाच जमणारा असेल. तर असं अजिबात नाही. अगदी दहावी पास व्यक्तीही हा जॉब करू शकेल असा आहे. पण तरीही हा जॉब करायला लोकं मागे पुढे बघत आहेत. खरं म्हणजे हा जॉब फक्त टॉवरवरील बल्ब बदलण्याचा आहे. मग यात अवघड काय?
बाबो! मराठी मिडीयमच्या पेपरमध्ये चक्क हिंदी आणि इंग्रजीत प्रश्न? ‘या’ विद्यापीठाचा अजब कारभार समोर
बल्ब बदलण्यासाठी कंपनी 1 कोटी पगार देत आहे. जाहिरातीनुसार, नोकरीतील काम टॉवर लँटर्न चेंजरचे आहे. ही नोकरी अमेरिकेतील साऊथ डकोटा इथे हा जॉब देत आहे.
नक्की काय कठीण आहे या जॉबमधे टॉवर लँटर्न चेंजरचं काम तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही. हे सामान्य टॉवर्सपेक्षा थोडं वेगळं आहे. उंची जितकी जास्त असेल तितके टॉवरचं टोक खूप पातळ होतं. या ठिकाणी वाराही उंचावर ताशी 100 किमी वेगानं वाहतो. त्यावर चढणाऱ्या लोकांना एकाच दोरीच्या साहाय्यानं बांधले जातं, ज्यामुळे त्यांना सुरक्षितता मिळते. या बुरुजावर चढायला तीन तास लागतात आणि तेवढाच वेळ खाली उतरायला लागतो. म्हणजे एकूण कामाचा वेळ 6 ते 7 तास असू शकतो. टॉवरचा बल्ब दर 6 महिन्यांत एकदा किंवा दोनदा बदलावा लागतो. टॉवरवर चढून हे काम त्या व्यक्तीला एकट्यानं करावं लागेल. यासाठी कंपनीच्या लोकांना 100000 पौंड (सुमारे 1 कोटी रुपये) वार्षिक वेतन पॅकेज मिळेल.
News18लोकमत
या जॉबसाठी आहेत शर्थी ब्रिटनच्या वृत्तपत्र मिरर यूकेनुसार, अर्जदारांनी उंचीची भीती बाळगू नये. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असलेले लोकही या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. पगार अनुभवावर आधारित असेल. व्यक्तीला टॉवरचा बल्ब दर सहा महिन्यांत एकदा किंवा दोनदा बदलावा लागेल. मग काय या सध्या सोप्या आणि भरघोस पगार असणाऱ्या नोकरीसाठी तुम्ही अप्लाय करणार का?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
[ad_2]
Source link