‘किती वर्ष तुम्ही तेच दाखवणार…’ तेजश्रीच्या नव्या मालिकेचा प्रोमो पाहताच प्रेक्षकांनी नोंदवल्या संतप्त प्रतिक्रिया – News18 लोकमत

[ad_1]

मुंबई, 29 जुलै : ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान
. गेली दोन वर्ष तेजश्री छोट्या पडद्यापासून दूर आहे. ती शेवटची ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेत दिसली होती. तिच्या शुभ्रा या भूमिकेला सुद्धा प्रेक्षकांनी खूप पसंत केलं होतं. आता तेजश्री प्रधान पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेतून एका नव्या अंदाजात तेजश्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला असून त्यावर प्रेक्षक विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. तेजश्रीने काही दिवसांपूर्वीच ‘मी येतेय…’ असं म्हणत नव्या मालिकेची घोषणा केली होती. या मालिकेत तिची भूमिका काय असेल, मालिकेचं नाव काय हे सगळं जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. आता नुकताच मालिकेचा एक नवाकोरा प्रोमो रिलीज झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता संपली आहे. तेजश्रीच्या या नव्या मालिकेचं नाव ‘प्रेमाची गोष्ट’ असं असून त्यात तिच्यासोबत ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम राज हंचनाळे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी विविध प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

News18लोकमत


News18लोकमत

गोष्ट प्रेमाची या मालिकेच्या प्रोमोनुसार, या मालिकेत तेजश्री मुक्ता हे पात्र साकारणार असून ती एक स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. पण ती कधीच आई होऊ शकत नाही. तर दुसरीकडे राज हंचनाळे सागर हि व्यक्तिरेखा साकारतोय जो त्याच्या मुलीसाठी एक आई शोधतोय. हे दोघे एकमेकांच्या शेजारीच राहतात. आता मुलीच्या माध्यमातून दोघांच्या प्रेमाची गोष्ट कशी सुरु होते हे मालिकेत पाहायला मिळणार आहे. पण ह्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक फारसे खुश नसल्याचं दिसतंय. ‘करण जोहर तुला लाज वाटली पाहिजे….रिटायर हो’ RARKPK पाहताच संतापली कंगना; रणवीर केली बोचरी टीका तेजश्रीची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका स्टार प्लस ची गाजलेली मालिका ‘ये है मोहब्बतें’ चा रिमेक असल्याचं प्रेक्षक म्हणतायत. तर काही वर्षांपूर्वीच याच विषयावर आधारित ‘नकळत सारे घडले’ ही मालिका देखील स्टार प्रवाह वर चांगली गाजली होती. त्यामुळे  ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेच्या कथानकात काहीच वेगळं नसल्याचं म्हणत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

स्टार प्रवाहाने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी ’ हिंदी सीरियलची कॉपी…’, ‘मला वाटतंय की अगोदर नकळत सारे घडले already येऊन गेली आहे आणि ती पण 2 वर्षे चालली. मग एकाच चॅनेल वर स्टोरी repeat करण्यात काय अर्थ आहे. अगोदर आली नसती तर ठीक होतं. पण किती वेळा तेच तेच दाखवणार’, ‘हे प्रवाह वाले फक्त हिंदी सीरीअल ची कॉपी करत आहेत ही आहे ए है मोहोबते….’, ‘मला कळत नाही की स्टार प्रवाह वाले अगोदर एक रिमेक करतात आणि पुन्हा एकदा रिमेक करतात. या सिरीयलचा अगोदर एकदा रिमेक झालेला आहे आता पुन्हा एकदा रिमेक?’,‘बेक्कार प्रोमो आहे, लाडे लाडे बोलणारी तेजश्री प्रधान, hot headed hero, आणि त्याची ती गोड छोटी मुलगी . किती वर्षे तुम्ही हेच आणि हेच दाखवणार आहेत? नवीन विषय काहीच सुचत नाही का हो तुम्हाला?’, ‘मालिकेची कथा खुप कॉमन आहे..ह्यावर आधी पण झाल्या आहे मालिका…पण जाऊद्या…. तेजश्री आहे म्हणजे मालिका हिट च होणार’ अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *