खांद्यापासून हात वेगळा झाला, तसाच घेऊन तो डॉक्टरांकडे गेला आणि घडला चमत्कार

[ad_1]

देहरादून, 29 जुलै : तुम्ही अनेकदा अशा अपघातांबद्दल ऐकलं असेल ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला त्याचा हात किंवा पाय गमवावा लागला आहे. असे झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला कृत्रिम हात किंवा पाय लावण्याची नामुष्की ओढवते. परंतु एम्स रुग्णालयातील डॉक्टर ऋषिकेश आणि त्यांच्या टीमने एका रुग्णाचा खांद्यापासून तुटून पडलेला हात पुन्हा जागेवर जोडला. या सर्जरीनंतर डॉक्टरांच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. पिथौरागढ जिल्ह्यातील धारचुला भागातील रहिवासी शरीफ अन्सारी यांचा हात काँक्रीटच्या मशीनमध्ये काम करताना खांद्यापासून तुटला आणि वेगळा झाला होता. शरीफ यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, तेथून त्यांना एम्स रुग्णालयात डॉक्टर ऋषिकेश यांच्याकडे पाठवण्यात आले. ओल्या स्वच्छ कपड्यात गुंडाळून, कापलेला हात बर्फाच्या डब्यात ठेवण्यात आला आणि त्याला हेली अॅम्ब्युलन्सद्वारे एम्स येथे पाठवण्यात आले. जवळपास 5 तास शस्त्रक्रिया करून डॉक्टर ऋषिकेश आणि त्यांच्या टीमने रुग्णाचा हात पुन्हा जागेवर बसवला.

News18लोकमत


News18लोकमत

एम्स रुग्णालयाच्या ट्रॉमा विभागाचे प्रमुख डॉ. कमर आझम आणि प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. विशाल मगो यांच्या नेतृत्वाखाली शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने तब्बल 5 तासांची अखंड शस्त्रक्रिया पूर्ण करून जखमींच्या छाटलेल्या हाताला पुन्हा जोडले. तसेच रुग्णाला अपंगत्व पासून वाचवले.
…आणि IAS अधिकाऱ्यांनी धरले चक्क शिपायाचे पाय, सांगितलं भावुक कारण
डॉक्टरांच्या टीमने शस्त्रक्रिया करताना खराब झालेल्या रक्तवाहिन्या यशस्वीरित्या दुरुस्त केल्या आणि हाड पुन्हा जोडले. यानंतर, फ्लॅप मोबिलायझ करून सर्जिकल साइट झाकण्यात आली. यासाठी ऑप्टिकल मायक्रोस्कोप, फ्लोरोस्कोपी इत्यादींचा वापर करण्यात आला. तुटलेल्या भागाच्या नसांचे विच्छेदन करून त्यानंतर रक्तवाहिन्या आणि शिरा दुरुस्त करून रक्ताभिसरण पुन्हा सुरू करण्यात आले. एका आठवड्यानंतर, जखम साफ करण्यासाठी दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. मुख्य रक्तवाहिनी दुरुस्त करून हाताला दररोज ड्रेसिंग केली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *