गव्हर्नमेंट जॉब म्हणजे फक्त चांगला पगारच नाही; ‘हे’ तोटेही आहेत; वाचून म्हणाल नको ती सरकारी नोकरी

[ad_1]

मुंबई, 10, जून:  शिक्षण घेत असताना अनेक जण सरकारी नोकरीसाठी तयारी करत असतात. सरकारी नोकरीमुळे आर्थिक सुरक्षा व स्थैर्य येतं. भारतातील कोट्यवधी उमेदवार वर्षानुवर्षे सरकारी नोकरीसाठी तयारी करत असतात. दरवर्षी ही संख्या वाढत जाते. सरकारी नोकरीच्या परीक्षेसाठी तयारी करण्याचे अनेक फायदे आहेत, पण जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात वर्षानुवर्षे सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करण्यात अनेक तोटे आहेत. यामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो, त्याबद्दल जाणून घेऊयात. या संदर्भात ‘झी न्यूज हिंदी’ने वृत्त दिलंय. 10वी पास उमेदवारांसाठी थेट इंडियन आर्मीमध्ये नोकरी; या दिवशी सुरु होणार अर्ज

 1. स्पर्धा : भारतात सरकारी नोकरीच्या परीक्षा खूप स्पर्धात्मक असतात, लाखो उमेदवार मर्यादित काही पदांसाठी स्पर्धा करतात. यामुळे तयारीसाठी खूप मेहनत करावी लागते आणि वेळ देऊनही नोकरी मिळणं अवघड होऊन बसतं. बऱ्याच जणांना फार कमी गुणांच्या फरकामुळे सरकारी नोकरी मिळत नाही.

2. लांबलचक निवड प्रक्रिया: भारतातील सरकारी नोकऱ्यांसाठी निवड प्रक्रिया खूप लांब आणि किचकट आहे. यामध्ये प्रवेश परीक्षा, मुलाखत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यासारखे विविध राउंड्स असतात. उमेदवारांसाठी ही एक तणावपूर्ण आणि वेळखाऊ प्रक्रिया असते. उच्चशिक्षित तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी; `या` पदासाठी भरती प्रक्रिया सुरू

3. नोकरशाही वातावरण: भारतातील सरकारी संस्थांमध्ये कठोर नियम, प्रक्रिया, नोकरशाही तसेच हायरारकी असते. सरकारी नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारासाठी या गोष्टी खूप आव्हानात्मक असतात. ज्या उमेदवारांना लवकर, चपळाईने काम करणं पसंत असतं, त्यांच्यासाठी हे खूपच निराशाजनक असू शकतं.

4. करिअरमध्ये वाढीच्या मर्यादित संधी: भारतातील सरकारी नोकऱ्या सुरक्षा आणि स्थिरता देतात, परंतु इथे पगार व प्रमोशनसाठी मर्यादित संधी आहेत. त्यामुळे करिअर ग्रोथ आणि चांगल्या कमाईच्या शक्यता शोधणाऱ्या उमेदवारांसाठी इथं बरीचं आव्हानं आहेत. UPSC NDA परीक्षा देण्याचा विचार करताय? मग इथे मिळेल संपूर्ण सिलॅबस 5. मर्यादित लवचिकपणा: भारतातील बर्‍याच सरकारी नोकऱ्यांमध्ये कामाचे तास निश्चित असतात आणि कामाच्या वेळेच्या बाबतीत थोडी लवचिकता असते. पण ज्या उमेदवारांना त्यांच्या पर्सनल व प्रोफेशनल आयुष्यात समतोल साधण्यासाठी अधिक लवचिक कामकाजाची व्यवस्था आवश्यक असते, त्यांच्यासाठी हे एक आव्हान ठरू शकतं.

News18लोकमत


News18लोकमत

सरकारी नोकरीचे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीची तयारी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्याचे फायदे व तोटे दोन्ही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे उमेदवारांनी त्यांचे प्राधान्यक्रम व करिअरमधील लक्ष्य या गोष्टींचा विचार करून योग्य निर्णय घ्यायला हवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *