घडून येतोय राजयोग, अनेकांची होतील स्वप्न पूर्ण Video – News18 लोकमत

[ad_1]
नागपूर, 3 जुलै : ग्रहांच्या संयोगाचा राशीवर फार मोठा प्रभाव पडत असतो. ज्योतिष्य शास्त्रानुसार सध्या सुरू असलेले जुलै महिना हा अतिशय महत्वपूर्ण आणि काही राशीसाठी फार लाभदायक ठरणार आहे. जुलै महिन्यामध्ये चार ग्रह हे आपल्या राशीमध्ये उच्चस्थानी पोहचणार असून त्याचा लाभ काही राशींना होणार आहे. ज्योतिष्य शास्त्रात या योगाला राजयोग म्हणून संबोधले गेले आहे. ज्योतिष्य शास्त्रनुसार काही राशीसाठी जुलै महिना अतिशय शुभ आणि लाभदायक ठरणार असून या महिन्यातील राजयोगामुळे जुलै महिन्याचे अन्यण्यसाधरण महत्त्व आहे. नेमक्या कसा असणार आहे हा राजयोग आणि त्याचा कुठल्या राशीनां फायदा होणार आहे, याबाबतच
नागपूरचे
ज्योतिष शास्त्र अभ्यासक ज्योतिर्वेद भूषण यांनी माहिती दिली आहे. काय आहे राजयोग? ज्योतिष शास्त्रनुसार सुरू असलेल्या जुलै महिना फार महत्त्वाचा महिना मानल्या गेला आहे. त्यामागील कारण असे की या महिन्यातील चार ग्रह हे त्यांच्या राशीमध्ये उंचीचे होणार आहेत. जेव्हा कोणताही ग्रह हा शुभ होऊन आपल्या स्वतः च्या राशीत किंवा मूलत्रिकोन राशीत जातो त्याला उच्चस्थानी पोहचणे त्याला राजयोगकारक स्थिती असे म्हणतात. या महिन्यात शुक्र, गुरू, बुध आणि शनी देव हे वक्रि मार्गी होऊन आपल्या राशीमध्ये उंचीचे होत आहेत आणि ते समाज जीवनात अतिशय चांगला प्रभाव आणि शुभ प्रभात टाकतील.
News18लोकमत
यामध्ये शनिदेव कुंभेतून मकरमध्ये जाऊन शश राजयोग होईल तर शुक्र हा चंद्रच्या राशीमध्ये उच्च गणला जातो तो कर्कमध्ये मालव्या या नावाचा राजयोग बनवेल बुध आपल्या राशीमध्ये उच्च होऊन सूर्यासोबत बुधादित्य योग बनवेल आणि स्वतःच्या राशीमध्ये येऊन भद्रयोग बनवेल. आणि गुरु वक्रि होऊन परत आपल्या उच्च असणाऱ्या मीन राशीत जातील आणि हंसयोग या नावाचा राजयोग बनवतील ही अतिशय उत्तम स्थिती आहे ती समाज जीवनात अतिशय शुभ प्रभाव टाकणारी आहे. बुधच्या उच्चमुळे वाणिज्य आणि व्यापारमध्ये चांगली गती प्राप्त होणार आहे. तर शुक्राच्या उंचीमुळे ऐश्वर्यामध्ये वाढ होणार आहे. गुरुच्या वक्रीमुळे जो राजयोग होतोय त्यामुळे लोकांचे अडलेले काम, शिक्षणामध्ये प्रगती आणि लग्न जुळण्याचे संभावना सर्वाधिक आहे. ज्यांना साडेसाती सुरू आहे ज्यामध्ये मकर कुंभ आणि धनुची नुकतीच संपली आहे तर शनी देवामुळे वक्री होईल आणि अडलेले काम आहेत, जे थांबून आहेत अशी कामे शनिदेव पूर्ण करतील. तर एकंदरीत जुलै महिना या चार ग्रहांच्या उच्चमुळे समाज जीवनात खूप चांगला प्रभाव आपल्याला दिसून येईल.
Pisces Horoscope July 2023 : 15 जुलैपर्यंत थांबा, पुन्हा उघडतील नशिबाचे दरवाजे
गुरुदेव कृपा प्राप्तीसाठी दत्त मंदिरामध्ये पिवळे फुल पेढे मिठाईचा वाटप करावा शुक्राला प्रसन्न करण्यासाठी आणि शुभ फुल प्राप्तीसाठी देवीच्या मंदिरात जाऊन कुठल्याही लहान मुलींना पांढऱ्या पेढ्याचे वाटप करावे. बुधसाठी गणपती पुढे मोदकाचा प्रसाद ठेवून त्याचा वाटप करावा किंवा लहान मुलांना पुस्तकाचे वाटप करावे. शनिदेव हे फलंदाता म्हणून मानले जातात त्यांना प्रसन्न करण्यासाठी शनि मंदिरात सरसोजा तेलाचे दान करावे आणि कुठलाही गोरगरिबांना सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चप्पल किंवा छत्रीचे वाटप करावे. या उपायाने इच्छित फुलप्राप्तीसाठी मोठी सहाय्य ठरू शकते,अशी माहिती ज्योतिष शास्त्र अभ्यासक ज्योतिर्वेद भूषण यांनी दिली. अनेकांना खूप चांगला अनुभव जुलै महिना या राजयोगामुळे अतिशय पवित्र आणि शुभ महिना आहे. या महिन्यांमध्ये मासांचे आणि मदिरा पानाचे तसेच कुणाची हत्या आणि कुणालाही न दुखवता चांगल्या शिलाचे पालन करावे या महिन्यात अनेकांना खूप चांगला अनुभव आणि त्यांच्या जीवनात चांगले फळ प्राप्त होताना दिसणार आहे, असे ज्योतिर्वेद भूषण यांनी सांगितले. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
[ad_2]
Source link