घराच्या रिनोवेशनसाठी बँक देते कर्ज; जाणून घ्या व्याज, टॅक्स सूटसह आवश्यक गोष्टी – News18 लोकमत

[ad_1]

Home Renovation Loan: बँका आणि NBFC कंपन्याही लोकांना घराच्या नूतनीकरणासाठी कर्ज देतात. या प्रकारचे कर्ज विशेषतः घर मालकांना त्यांच्या घरामध्ये सुधारणा करण्यासाठी दिसले जाते. तुम्हाला तुमचे जुने घर नवीन पद्धतीने डिझाइन करायचे असेल किंवा त्याचे नूतनीकरण करायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारचे कर्ज घेऊ शकता. घराला लागणारा कमी करण्यासाठी अशा प्रकारचे कर्ज दिले जाते. घराची किंमत कमी करण्यासाठी अशा प्रकारचे कर्ज दिले जाते.

News18लोकमत


News18लोकमत

हे लोन खूप प्रसिद्ध आहे, जे मुख्यतः बँका, नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या (HFCs) देतात. या होम लोनचा वापर घरातील विविध सुधारणांसाठी पैसे देण्यासाठी केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, तुम्हाला स्वयंपाकघर किंवा बाथरुम पुन्हा तयार करायचे असल्यास, नवीन खोली किंवा अतिरिक्त खोली अॅड करायची किंवा प्लंबिंग, इलेक्ट्रिक आणि घरातील एनर्जीमध्ये सुधारणा करायची असल्यास दिलं जातं. लोन अमाउंट किती असेल तुम्ही घराच्या नूतनीकरणासाठी कर्ज घेत असाल, तर तुम्ही 5 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन घेऊ शकता. तर घराच्या नूतनीकरणासाठी 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. पण हे सर्व कर्जदारावर अवलंबून असते. यासोबतच ग्राहकाची संपत्ती आणि इतर कागदपत्रांच्या आधारे कर्जाची रक्कमही दिली जाते. किती द्याव लागेल व्याजदर तुम्ही घराच्या रिनोवेशनसाठी कर्ज घेतल्यास, बँका होम लोनपेक्षा जास्त व्याज आकारतात. कारण अशी कर्जे जोखिमयुक्त असतात. फ्लोटिंग व्याजदरावर गृहकर्ज दिले जाते. होम लोनचा व्याजदर क्रेडिट स्कोअर, कर्जाची रक्कम, नियोक्त्याचे प्रोफाइल आणि व्यवसाय इत्यादी लक्षात घेऊन दिला जातो. पर्सनल कर्जाच्या तुलनेत त्याचे व्याजदर कमी आहेत, जे 8% ते 12% पर्यंत असू शकतात. कर्ज परतफेड कालावधी 20 वर्षांपर्यंत असू शकतो.
Loan on FD: फिक्स्ड डिपॉझिटवर सहज मिळतं लोन, जाणून घ्या व्याजदर किती
कोणाला मिळेल हे लोन तुम्ही भारतीय नागरिक असायला हवेत. यासोबतच इन्कमचे नियमिस सोर्स असायला हवेत. तुमचं वय 21 वर्षे असायला हवं आणि क्रेडिट स्कोअर चांगला असावा. तुम्हाला उत्पन्न आणि रोजगार, चांगला क्रेडिट स्कोअर आणि स्थिर फायनेंस हिस्ट्री पुरावा देखील द्यावा लागेल. कोणती कागदपत्रे आवश्यक? भारतात घराच्या नूतनीकरणासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये ओळख, पत्ता, उत्पन्न आणि रोजगाराचा पुराव्याचा समावेश असतो. तुम्हाला मालमत्तेच्या मालकीचा पुरावा आणि कालेटरलचा पुरावा, अंदाजे दुरुस्ती खर्च देखील प्रदान देणे आवश्यक आहे.
Home Loan : ना सॅलरी, ना इन्कम टॅक्स, तरीही मिळेल होम लोन! फक्त करा हे काम
टॅक्स सूट तुम्ही हे लोन घेतल्यास, कर्जदार कलम 24 (b) अंतर्गत कर वजावट अंतर्गत वार्षिक 30,000 रुपयांपर्यंतच्या व्याजाचा दावा करू शकतो. ही वजावट स्वतःच्या घरावर 2 लाख रुपयांपर्यंतच्या व्याजावर करता येते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *