घरात लावा पोपटाचा फोटो; होतील मोठे लाभ, विद्यार्थ्यांना मिळेल उत्तर

[ad_1]

डोंबिवली, 22 जुलै: पोपट हा सर्वांच्याच आवडीचा पक्षी आहे. माणसांमध्ये रमणारा आणि बोलणारा हा पक्षी दिसायलाही आकर्षक असतो. या पक्षाची गणना बुद्धिवान पक्षी म्हणून केली जाते. अध्यात्मात देखील या पक्षाला स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे या पक्षाचे फोटो घरात लावले तर विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होतो, अशी माहिती
डोंबिवलीतील
 पंडित मुकुंद जोशी यांनी दिली. भागवत कथा आणि सकारात्मक ऊर्जा भागवत कथा श्रवण केल्याने घरातील नकारात्मक उर्जा निघून जाते. घरातील विद्यार्थ्यांवर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो. ही कथा शुकाचार्य महाराज म्हणजेच पोपटाने सांगितली आहे. त्यामुळे पोपटाचा फोटो घरात ठेवावा. त्यामुळे सर्व गृहदोष नष्ट होतील. अनेक समस्यांपासून मुक्ती मिळेल, असे जोशी सांगतात.

News18लोकमत


News18लोकमत

वास्तूशास्त्रानुसार उत्तरेला असावा फोटो यावेळी ‘हे शुकाचार्य मझी वाणी अशी कर की मी बोलेन ते सत्य होईल आणि ते कायम गोड असेल अशी बुद्धी दे’, अशी प्रार्थना पोपटाच्या फोटोकडे करावी. वास्तूशास्त्रा प्रमाणे फोटो उत्तर दिशेला असावा. त्यामुळे विद्यार्थ्यांना सकारात्मक ऊर्जा मिळते. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागते आणि अनेक प्रश्नांचे उत्तर सापडतात, असे जोशी सांगतात.
अधिक मासातील पौर्णिमा कधी आहे? चंद्रदोष मुक्ती उपाय, पूजेचे शुभ मुहूर्त पहा
शुकाचार्य महाराज आणि पोपटाचा संबंध पोपटाला शुक असे संबोधले जाते. संपूर्ण भागवत शुकाचार्य यांनी सांगितली. पार्वतीला शंकर भगवानांनकडून कथा ऐकायची होती. ही कथा फक्त देवी पार्वतीने ऐकावी यासाठी ते पार्वती मातेला जंगलात घेऊन गेले. कथा ऐकता ऐकता पार्वती देवी कथेवर हुंकार देत होत्या. मात्र मध्येच पार्वती देवीला झोप लागली. हे तिथे बसलेल्या एका पोपटाने पाहिले. तर शंकर भगवान यांची कथा पुढे चालू राहावी यासाठी त्यांनी हुंकार दिला. यावेळी शंकर भगवान यांना पोपट बसल्याचे समजले. ते पोपटाच्या दिशेने जावू लागले मात्र पोपट घाबरला आणि महर्षी ऋषींच्या आश्रमात बसलेल्या त्यांच्या पत्नीच्या गर्भात शिरला. त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी भगवान कृष्णाच्या विनंती नंतर तो मानवाच्या रूपाने बाहेर आला आणि ते शुकाचार्य महाराज बनले. त्यानंतर त्यांनी महर्षी व्यास ऋषी यांच्याकडून भागवत शिकले. हेच भागवत राजा परिक्षिताला सांगितले अशी कथा आहे. त्यामुळे पोपटाला बुद्धिवान पक्षी समजतात असे मुकुंद जोशी सांगतात. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *