चार मोठे ग्रह करणार राशीमध्ये बदल, पाहा कुणाला होणार फायदा? – News18 लोकमत

[ad_1]

पुणे, 1 जुलै : नव्या महिन्यात आपलं भविष्य कसं असेल याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. जुलै महिन्याला आता सुरूवात झालीय. या महिन्यात चार मोठे ग्रह राशी बदल करणार आहेत. त्याचा तुमच्या भविष्यावर काय परिणाम होईल? कोणत्या राशींवर याचा सकारात्मक  परिणाम होणार आहे? याबाबत
पुण्यातील
ज्योतिषतज्ज्ञ सिद्धेश्वर मारटकर यांनी माहिती दिली आहे. कसा असेल  जुलै? ग्रहांचा सेनापती असलेला मंगळ ग्रह 1 जुलै 2023 रोजी रात्री 2 वाजून 37 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करेल. त्यानंतर सौंदर्य आणि भौतिक सुखांचा कारक असलेला शुक्र ग्रह 7 जुलै 2023 रोजी पहाटे 4 वाजून 28 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करेल. यामुळे सिंह राशीत लग्न भंग योग तयार होणार आहे.बुध ग्रह 8 जुलै 2023 रोजी रात्री 12 वाजून 19 मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करेल.

News18लोकमत


News18लोकमत

अस्ताला गेलेल्या बुध ग्रहाचा 14 जुलै 2023 रोजी उदय होईल आणि प्रगतीची नवी दारं उघडतील. 17 जुलै 2023 रोजी सूर्यदेव सकाळी 5 वाजून 19 मिनिटांनी कर्क राशीत गोचर करेल. यामुळे बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होईल.25 जुलै 2023 रोजी बुध ग्रह सकाळी 4 वाजून 38 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करेल. यामुळे सिंह राशीत शुक्र, मंगळ आणि बुधाच्या युतीमुळे त्रिग्रही योग तयार होईल. 23 जुलै 2023 रोजी शुक्र ग्रह कर्क राशीत वक्री होणार आहे.
तुमची रास धनु आहे? जुलै महिना आहे खास, जीवनात होतील 5 मोठे बदल, Video
ग्रहांच्या उलथापालथीमुळे राशीचक्रातील तीन राशींना जबरदस्त फायदा होणार आहे.  मेष, सिंह आणि तूळ राशीला याचा फायदा होणार आहे.  या काळात राशीच्या उत्पन्नात वाढ होईल. त्याचबरोबर नवे आर्थिक स्रोत निर्माण होतील, अशी माहिती मारटकर यांनी दिलीय.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *