दर महिन्याचा पगार द्यायची आईला; 12 वर्षांनी बँक अकाऊंट पाहिलं आणि लेकीला बसला जबर झटका

[ad_1]
नवी दिल्ली, 28 जुलै: अनेकजण आपला पगार आपल्या घरच्यांकडे देतात. पूर्ण नाही तर पगारातील काही रक्कम तर देत असतात. खास करुन आईकडे. कारण आई चांगल्या प्रकारे पैशांची बचत करु शकते त्यामुळे जास्तीत जास्त पैशांची बचत होऊ शकते. असंच काहीसं एका मुलीने केलं मात्र शेवटी तिनं अकाऊंट बॅलन्स पाहिल्यावर तिला धक्काच बसला. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. हे प्रकरण काय आहे याविषयी जाणून घेऊया. एक तरुणी गेल्या 11 वर्षांपासून आपल्या पगारातील काही रक्कच आईला देत होती. जेणेकरुन तिच्या पैशांची बचत होईल. तिच्या लग्नाच्यावेळी तिनं अकाऊंट पाहिलं तेव्हा तिला धक्का बसला. याविषयी साऊथ चायना मॉर्निंगने पोस्ट शेअर केली आहे.
News18लोकमत
तरुणीनं अनानिक 2 कम्युनिटी नावाच्या फेसबुकवर ही घटना शेअर केली. तिची पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली आणि अनेक लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. मुलीनं सांगितलं की, ग्रॅज्युएशननंतर मला नोकरी लागली. पैशांची बचत करण्यासाठी मी गेली 12 वर्षे माझ्या पगारातील काही रक्कम आईला देत होते. तेव्हापासून आतापर्यंत 90000 डॉलर्स म्हणजेच 72,98,507 रुपये साचायला हवे होते. मात्र जेव्हा तिनं अकाऊंट चेक केलं तेव्हा अकाऊंटवर फक्त 1.31 लाख रुपये शिल्लक होते. हे पाहून तिला मोठा धक्का बसला.
ट्रेनमध्ये काहीही खरेदी किंवा खात असाल तर हा VIDEO पाहा, पाहून येईल किळस
दरम्यान, तिला जेव्हा कमी पैसै पडायचे तेव्हा ती आईला पैस मागायलाही घाबरायची. आई तिला विनाकारण खर्च करु नको म्हणून ओरडायची. मग तिला कधी पैसे कमी पडले तरीही ती आईला पैसे मागत नव्हती. मात्र लग्ना करण्याच्या वेळी जेव्हा तिनं अकाऊंट चेक केलं तेव्हा तिचं डोकं चक्रावलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link