‘दुसरीकडे असेल की मळ, तुमच्याकडे आला की…’, उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात – News18 लोकमत

[ad_1]

अजित मांढरे, प्रतिनिधी ठाणे, 29 जुलै : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ठाण्यामध्ये उत्तर भारतीयांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या वर्षी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ठाण्यात जाहीर कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधला. स्वार्थाकरता कुटनिती केली जाते, चाणक्यनिती नाही. हिंदुत्वाचा अर्थ काय? मंदिरातील घंडा बडवणारं आमचं हिंदुत्व नाहीये, दहशतवाद्यांना बडवणारं हिंदुत्व आहे. मुंह मे राम, हात में काम असं आमचं हिंदुत्व आहे. यांचं हिंदुत्व खोटं आहे, यांचा मुखवटा आपल्याला फाडायचा आहे. बाबरी पडली तेव्हा भाजपवाले उंदराच्या बिळात घुसले होते. मी खुलेआम काँग्रेससोबत गेलो, अंधारात गेलो नाही. भाजपसोबत मजबूत युती होती ती भाजपनेच तोडली. तानाशाहीपुढे मी कधीच झुकणार नाही, असं टीकास्त्र उद्धव ठाकरेंनी भाजपवर सोडलं आहे.
‘माझ्या गळ्यात पट्टा बांधणारा…’, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा पलटवार
भ्रष्टाचाऱ्यांसोबत पंतप्रधान बसणार आहेत, त्यांचा सत्कार करणार आहेत. राम मंदिराकरता यांनी कायदा बनवला नाही, लोकांकरता कायदा बनवत आहेत. तू भ्रष्टाचार करत आहेस, ये. आजा मेरी गाडी में बैठ जा, असं झालं आहे. दुसरीकडे असेल की मळ आणि भाजपमध्ये आलं की कमळ. भाजप आता भ्रष्ट जनता पार्टी झाली आहे, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

News18लोकमत


News18लोकमत

‘निवडणुका आल्या की यांना जुन्या मित्रांची आठवण होते. हा देश मोदींचा नाही गरिबांचा आहे. निवडणुका आल्या की धार्मिक लढाया लावल्या जातात. विकास तर इंग्रज पण करत होते, पण त्यांची गुलामी आम्हाला नको होती. निवडणुकीच्या वेळी हे तुम्हाला गंडवतात. आता लढाई सुरू झाली आहे, हे तुम्हाला आपापसात लढवतील,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले. ‘मी मोदींच्या नाही, तानाशाहीच्या विरोधात आहे. भारत मातेला पुन्हा गुलाम होऊ देणार नाही. उठ बोललो की उठ बस बोललो की बस, अशी गुलामी आम्हाला नको आहे,’ असा निशाणा उद्धव ठाकरे यांनी साधला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *