दृष्ट लागली असेल तर या संकेतांवरून कळतं; हे उपाय वेळीच करणे फायद्याचे – News18 लोकमत

[ad_1]
मुंबई, 04 जुलै : आपल्याकडे विशेषत: लहान बाळाला दृष्ट लागू नये, म्हणून काही उपाय केले जातात. खराब नजर उतरवणे किंवा दृष्ट लागू नये, यासाठी अनेक युक्त्या करतात. हाताच्या मनगटावर आणि गळ्यात काळा धागा बांधतात, आईजवळ लोखंडी वस्तू ठेवतात, जेणेकरून वाईट नजर दोघांनाही लागू नये. दृष्ट लागल्याचे किंवा वाईट नजर असल्याचे कसे ओळखता येईल याबद्दल जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हीही पुढच्या वेळेपासून सावध व्हाल. दृष्ट लागल्याचे कसे ओळखाल – ज्यांना कोणाची नजर किंवा दृष्ट लागते, त्यांना नेहमी थकवा, चिडचिड, अस्वस्थता यासारख्या समस्या जाणवतात. त्याला डोकेदुखीचा त्रासही होतो. याशिवाय झोपही व्यवस्थित येत नाही.
News18लोकमत
ज्यांना दृष्ट लागते, त्यांना व्यवसायात मोठे नुकसान सहन करावे लागते. म्हणूनच नोकरी-धंद्यातून मिळणाऱ्या पैशांविषयी कोणाशी जास्त फुशारक्या मारू नयेत. तसेच मुलांना दृष्ट लागली असल्यास ते खूप रडू लागतात आणि खाणे-पिणे देखील बंद करतात. लागलेली दृष्ट कशी काढायची? जर तुमच्या मुलाला दृष्ट लागली असेल तर लाल सुकी मिरची घेऊन ती मुलाच्या डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा उतरवा. नंतर आगीत जाळून टाका. मिरच्या व्यवस्थित जळल्यावरच मागे वळून पहा.
Horoscope: सिंह राशीत मंगळ-शुक्राची यारी! महिनाभर या राशींचे नशीब राहणार जोमात
लाल मिरची नसेल तर लसूण, कापूस, मीठ, कांद्याची साल घेऊन मुलाच्या डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा उतरवा आणि नंतर जाळून टाका. जळाल्यानंतर याचा खराब वास आला तर दृष्ट लागलेली नाही आणि आला तर लागली आहे असे समजावे. त्याचबरोबर वाईट नजर टाळण्यासाठी हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडचे पठण सुरू करावे. केवळ ती व्यक्तीच नाही तर संपूर्ण कुटुंब यापासून वाचेल. घराला वाईट नजरेपासून वाचवायचे असेल तर कचरा साचू देऊ नका. सकाळ संध्याकाळ घराच्या मुख्य दारावर दिवा लावा आणि देव्हाऱ्यातही हाच नियम पाळा.
Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
[ad_2]
Source link