पुण्यात 11 वी ऑनलाइन प्रवेशाची पहिली यादी जाहीर, 42 हजार 239 विद्यार्थांचा प्रवेश निश्चित – News18 लोकमत

[ad_1]
चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 21 जून : दहावीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेशाचे वेध लागले आहे. इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या प्रवेश फेरीची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे विभागात 42 हजार 239 विद्यार्थ्यांची पसंतीक्रमानुसार निवड झाली आहे. आता विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयामध्ये जाऊन 24 जूनपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. पुणे विभागात एकूण 88 हजार 413 जागा असून त्यासाठी 63 हजार 442 विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. त्यातून पहिल्या फेरीसाठी 42 हजार 239 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विज्ञान शाखेसाठी 22 हजार विद्यार्थी आहेत. तर वाणिज्य शाखेसाठी 15 हजार आणि कला शाखेसाठी 3 हजार 800 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
(मोठी बातमी! ‘ती’ मोफत दिलेली पुस्तकं बालभारती विद्यार्थ्यांकडून घेणार परत; पण का? नक्की झालंय काय?)
सर्वाधिक विद्यार्थ्यांची निवड पहिल्या पसंतीक्रमानुसार, झाली आहे. सुमारे 23 हजार विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. पुण्यातील महाविद्यालयांमध्ये फग्युर्सन महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा सर्वाधिक 473 एवढा कटऑफ आहे. तर कला शाखेत सिम्बायोसिस महाविद्यालय आघाडीवर असून 468 कटऑफ आहे. वाणिज्य शाखेत बीएमसीसी महाविद्यालय आघाडीवर आहे. या महाविद्यालयाचा कटऑफ 466 एवढा आहे. पुण्यातील टॉप महाविद्यालयं (कंसात कला, वाणिज्य व विज्ञान शाखानिहाय कटऑफ)
कलमाडी हायस्कूल | 439 | 418 | 458 |
---|---|---|---|
मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर | 302 | 415 | 442 |
आबासाहेब गरवारे कॉलेज | 289 | NA | 448 |
बीएमसीसी कॉलेज | NA | 466 | NA |
सिंबोयोसिस कॉलेज | 468 | 453 | NA |
फर्ग्युसन कॉलेज | 429 | NA | 473 |
नेस वाडिया कॉलेज | NA | 315 | NA |
एस. पी. कॉलेज | 358 | 440 | 449 |
एस एम जोशी कॉलेज | NA | 373 | 420 |
शाखानिहाय उपलब्ध जागा ( एकूण अर्ज) कला – 14 हजार 61 (4 हजार 693) वाणिज्य – 35 हजार 215 (21 हजार 592) विज्ञान – 36 हजार 21 (36 हजार 712) एचएसव्हीसी – 3 हजार 116 (445) एकूण – 88 हजार 413 (63 हजार 442) शाखेनुसार विद्यार्थ्यांना मिळालेले प्रवेश कला – 3 हजार 812 वाणिज्य – 15 हजार 626 विज्ञान – 22 हजार 374 एसएसव्हीसी – 427 एकूण – 42 हजार 239 पसंतीक्रमानुसार झालेली निवड 23 हजार 351 6 हजार 975 3 हजार 897 2 हजार 412 1 हजार 823 1 हजार 290 950 679 481 381
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link