फक्त 1 दिवस शिल्लक, सोडू नका ही संधी! हायर पेन्शनसाठी अप्लाय करण्याची डेडलाइन आली जवळ – News18 लोकमत

[ad_1]

मुंबई, 10 जुलै : कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत अधिक पेन्शनसाठी अर्ज करण्याची डेडलाइन संपत आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पात्र सदस्यांना हायर पेन्शनचा ऑप्शन निवडण्याचा पर्याय दिला आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जुलै 2023 ठरवण्यात आली आहे. त्यामुळे, जर तुम्ही अजुनही हायर पेन्शनसाठी अर्ज केला नसेल, तर डेडलाइन संपण्यापूर्वी हे काम पूर्ण करा. EPFO ​​ने आधीच दोनदा मुदत वाढवली आहे.

News18लोकमत


News18लोकमत

कामगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, EPFO ​​ने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 4 नोव्हेंबर 2022 रोजी पर्याय/संयुक्त पर्यायाच्या पडताळणीसाठी पेन्शनधारक/सदस्यांकडून अर्ज प्राप्त करण्याची व्यवस्था केली आहे. ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी उच्च पेन्शन ऑप्शन निवडण्याची अंतिम मुदत 3 मे 2023 होती. ती 26 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा मुदत वाढवून 11 जुलै ही अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली.
Life Insurance: तुमच्याकडेही असेल डेबिट कार्ड तर फ्रीममध्ये मिळेल 5 लाखांचं इन्शुरन्स, पण कसं?
1.16% अतिरिक्त पेमेंट घेतले जाईल मे महिन्याच्या सुरुवातीलाच कामगार मंत्रालयाने हे स्पष्ट केले होते की, हायर पेन्शनचा ऑप्शन निवडणाऱ्यांच्या मूळ पगाराच्या 1.16 टक्के अतिरिक्त योगदान EPFO ​​संचालित सामाजिक सुरक्षा योजनेत नियोक्ताच्या योगदानातून घेतले जाईल. सध्या, सरकार कर्मचारी पेन्शन योजनेत 15,000 रुपयांच्या मूळ वेतनावर अनुदानाच्या स्वरूपात 1.16 टक्के योगदान देते.आत्तापर्यंत, कर्मचारी EPFO ​​च्या सामाजिक सुरक्षा योजनेत 12 टक्के योगदान देतात. तर नियोक्त्याच्या 12 टक्के योगदानापैकी 8.33 टक्के EPS आणि 3.67 टक्के कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये जातात.
LIC ची जबरदस्त स्किम, फक्त एकदा करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा पेन्शन!
लगेच अर्ज करा – सर्व प्रथम ई-सेवा पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जा. आता होम पेजवरील Pension on Higher ऑप्शनवर क्लिक करा. – असे केल्यावर तुमच्या कंप्यूटर स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल, जिथे Click Here ऑप्शन दिसेल. – Click Here ऑप्शन निवडल्यानंतर, तुम्हाला नवीन पेजवर UAN क्रमांक आणि इतर माहिती विचारली जाईल. – आता दिलेल्या ठिकाणी UAN, नाव, जन्मतारीख, आधार कार्ड, आधार लिंक केलेला मोबाईल नंबर टाका. – आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर व्हेरिफिकेशनसाठी एक ओटीपी येईल, तो टाकून व्हेरिफिकेशन कराव लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *