बनियानला ‘सैंडो’ का म्हणतात? अशा विचित्र नावाचा अर्थ माहितीय का?

[ad_1]

मुंबई, 28 जुलै : बिनियान, गंजी, सँडोबॉडी अशा विविध नावांनी पुरुषांचे अंतर्वस्त्र ओळखले जाते. ही कपड्यांच्या आत घालण्याचं वस्त्र आहे. पण असं असलं तरी देखील काही पुरुष मंडळी विविध रंगाच्या बॉडी घालून फिरताना तुम्हाला सहज दिसतील. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की या बॉडी किंवा पुरुषांच्या अंतर्वस्त्रला सेंडोबॉडी का म्हणतात? सेंडोच्या त्याच्याशी काय संबंध? अनेक वेळा दुकानातून बनियान खरेदी करताना बनियान या शब्दाऐवजी तुम्ही फक्त ‘सँडो’ द्या असं म्हटला असाल आणि दुकानदाराला देखील सहज समजले असेल की तुम्हाला नक्की काय हवंय.
ट्यूब आणि ट्यूबलेस टायर दोघांचे फायदे तोटे माहितीयत?
पण मग प्रकरण अडकून पडते की त्याला ‘सँडो’ असं बनियानला का म्हणतात? कोणत्याही कंपनीचं नाव देखील सेंडो नाही. मग हा शब्द आलाच कुठून? चला या शब्दाचा आणि बनियानचा इतिहास जाणून घेऊ. सोर्स : सोशल मीडिया

सोर्स : सोशल मीडिया

1867 जर्मनीमध्ये युजेन सँडो नावाच्या एका मुलाचा जन्म झाला. सँडो 10 वर्षांचा होता तेव्हापासून त्याला बॉडीबिल्डिंगची आवड निर्माण झाली होती. त्याने अनेक बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये भाग घेऊन मोठे नाव कमावले. याच कारणामुळे युजेन सँडो यांना आधुनिक बॉडी बिल्डिंगचे जनक देखील म्हटले जाते. त्यामुळे या बनियानचे नाव त्याच्या ड्रेसिंग स्टाइलवरून पडले आहे.
हॉटेल रुममध्ये ‘ही’ वस्तू दिसली तर लगेच सावध व्हा, ती सामान्य नाही तर एक छुपा कॅमेरा
बॉडीबिल्डिंगच्या त्याच्या प्रवासादरम्यान, सॅन्डोचे शरीर सर्वात परिपूर्ण मानले गेले. त्यामुळेच लोक त्याला आणि त्याचं शरीर पाहण्यासाठी देखील लोक पैसे द्यायचे. जगभर फेरफटका मारून ते एखाद्या प्रदर्शनासारखे शरीर दाखवायचे. जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांसोबत सँडोही भारतात आला होता. विकिपीडियानुसार, युजेन सँडो 1905 साली भारतात आला होता. तोपर्यंत तो जगप्रसिद्ध झाला होता आणि लोक त्याला चांगले ओळखत होते.

News18

सोर्स : सोशल मीडिया सँडो हा खास प्रकारचा टी-शर्ट घालून बॉडीबिल्डिंग करत असे. ते कपडे बनियान सारखेच होते. तो भारतात आल्यानंतर अशा कपड्याचा ट्रेंड वाढू लागला. तेव्हापासून, या बनियानांना सँडो व्हेस्ट किंवा फक्त सँडो म्हणून ओळखले जाऊ लागले. ती आजच्या बनियानसारखीच होती जी स्लीव्हलेस असायची आणि अंगाला चिकटलेली असायची.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *