बापाने आयुष्यभर दुसऱ्याच्या शेतात तोडला ऊस, पोरगं आता अंगात घालणार खाकी वर्दी! – News18 लोकमत

[ad_1]

बीड, 12 जुलै: परिस्थितीची जाणीव ठेवून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली तर ते आपल्या ध्येयापर्यंत निश्चित पोहोचतात.
बीडच्या
अशाच एका ऊसतोड मजुराच्या मुलाने अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिलं. मात्र परिस्थिती आडवी येत असल्याने शिक्षण सुरू ठेवायचे का नाही असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. गावातील नव्याने अधिकारी झालेल्या एका मित्राने त्याला योग्य मार्गदर्शन केलं. त्याच्याच बळावर आकाश पाराजी काळे हा ऊसतोड मजुराचा मुलगा आता पोलीस उपनिरीक्षक झाला आहे. पीएसआय परीक्षेत आकाशचं यश महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 2020 साली पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकरी आणि ऊसतोड मजुराच्या मुलांनी घवघवीत यश मिळवलं आहे. बीड तालुक्यातील वांगी येथील रहिवासी असणारा आकाश काळे हाही पोलीस उपनिरीक्षक झाला आहे. आकाशाचे प्राथमिक शिक्षण त्याच्या राहत्या गावी पूर्ण झाल. तर माध्यमिक शिक्षण त्याने बीड येथे पूर्ण केले.

News18लोकमत


News18लोकमत

घरची परिस्थिती हालाकिची आकाशाची घरची आर्थिक परिस्थिती हालाकिची असल्यामुळे त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला. आकाशाचे वडील पाराजी काळे हे ऊसतोड मजूर आहेत. वर्षातून 6 महिने ऊसतोडणीसाठी पर राज्यात आणि पर जिल्ह्यात जावे लागते. त्यामुळे आकाश समोर आर्थिक संकट उभा राहिले. मात्र त्याने हार मानली नाही. पुढील उच्च शिक्षणासाठी आकाशने थेट पुणे गाठले. पुणे येथे पदवीचे शिक्षण घेत एका नामांकित फूड विक्री करणाऱ्या कंपनीमध्ये फुल टाइम जॉब केला. तेव्हाच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास देखील सुरू ठेवला.
दहावीला 44 टक्के अन् योगेश PSI बनला; शेतकरी बापाने गावात जंगी मिरवणूक काढली
चौथ्या प्रयत्नात यशाला गवसणी आकाशने 2017 मध्ये पहिल्यांदा पीएसआय पदाची परीक्षा दिली. पदवी पूर्णा नसल्यामुळे तो क्वालिफाय झाला नाही. पदवी पूर्ण झाल्यानंतर त्याने तीन वेळा पीएसआय पदाची परीक्षा दिली. तेव्हा देखील त्याच्या पदरी अपयश आले. मात्र 2020 परिक्षा दिल्यानंतर तो पीएसआय पदासाठी पात्र झाला. “माझी घरची परिस्थिती हालाखीची होती. वडील ऊस तोडणी साठी 6 महिने बाहेर गावी जात होते. त्यामुळे पुणे येथे मी नोकरी करत शिक्षण पूर्ण केले आणि आज हे यश मिळाले. यासाठी माझ्या आई-वडिलांचे मित्र परिवाराचे मोठे मार्गदर्शन मिळाले, असे आकाश सांगतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *