बाबा लगीन! असं लग्न तुम्ही आयुष्यात पाहिलं नसेल; VIRAL VIDEO पाहून सर्वांना भरली धडकी

[ad_1]

नवी दिल्ली, 28 जुलै :  प्रत्येक ठिकाणी लग्नाच्या वेगवेगळ्या प्रथा-परंपरा असतात. आता हौस म्हणून
लग्ना
त काहीतरी हटके करण्याचाही प्रयत्न असतो. लग्नाचे असे कितीतरी व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण सध्या लग्नाचा असा व्हिडीओ सोशल मीडियावर
व्हायरल
होतो आहे, जो पाहून सर्वांना धडकी भरली आहे. लग्नाचा व्हिडीओ आणि तोसुद्धा धडकी भरवणारा, कसा काय असू शकतो, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण लग्नाचा असा व्हिडीओ तुम्ही आयुष्यात पाहिला नसेल. सामान्यपणे लग्नानंतर रिसेप्शन, पार्टी, लग्नाची वरात असं काही ना काही असतं. पण एका कपलने लग्नानंतर असं काही केलं, ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. नवविवाहित दापम्त्याने हे एकट्यानेच केलं नाही. तर लग्नात आलेल्या पाहुण्यांनाही आपल्या या कृत्यात सहभागी करून घेतलं आहे. आता या कपलने असं केलं तरी काय हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.

News18लोकमत


News18लोकमत

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता हे कपल लग्नाचा मंडप, मॅरेज हॉल किंवा घरातही नाही. तर चक्क एका उंच डोंगरावर उभं आहे. डोंगराच्या टोकावर हे दाम्पत्य आहे. त्यांच्यासोबत इतर पाहुणेही आहेत. डोंगराच्या कडेवर उभं राहून या कपलने एकमेकांचा हात हातात धरला. तिथंच त्यांची लग्नगाठ बांधली गेली. लग्न लागल्यानंतर त्याचा आनंद म्हणून या कपलने त्याच डोंगरावरून खाली उडी मारली. त्यांच्यासोबत आणखी दोन लोकांनीही उडी मारली. या नवविवाहित जोडप्याने आणि त्यांच्या लग्नात आलेल्या पाहुण्याने अशा खतरनाक पद्धतीने लग्नाचं सेलिब्रेशन केलं आहे. त्यांनी स्कायडायव्हिंग केलं.
लेकीच्या लग्नाआधी आईची विचित्र इच्छा! मुलीला 100 तरुणांसोबत करायला लावलं ‘हे’ काम; दिले 40 हजार
कपलचं हे कृत्य पाहताच आपल्याला धडकी भरते. अक्षरशः काळजाचा ठोका चुकतो.  पण व्हिडीओ नीट पाहिला तर ते सर्व प्रोफेशनल स्कायडायव्हर्स आहेत हे दिसून येतं. त्यांनी सुरक्षेचीही पुरेपूर काळजी घेतलेली आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून आपल्याला भीती वाटल्याचं ्महटलं आहे. इतक्या उंचावरून फडी मारण्याची हिंमत तर आपली होणार नाही, असं एका युझरने म्हटलं आहे. काही युझर्सनी या कपलच्या साहसाचं कौतुक केलं आहे. एका युझरने आपल्यालाही आपल्या लग्नात असाच थरार अनुभवायाचा आहे, असं म्हटलं आहे.
लग्नात झाला गडबड घोटाळा! एक चूक आणि नवरदेवाच्या वडिलांसोबत नवरीचं लग्न
ओबेर्टा मॅनसीनोने इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

व्हिडीओ पाहून तुम्ही लग्नाचं असं सेलिब्रेशन करण्याचं धाडस करू नका. पण असं काही करण्याची हिंमत तुमची होईल का? लग्नाचं  हे असं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *