बायकोला 4 वर्ष दिलं हार्मोनल इंजेक्शन, वयाच्या 25 व्या वर्षी झाली नव्वदीची, कारण ऐकून बसेल धक्का

[ad_1]

मुंबई, 28 जुलै : कधी कधी आपल्यासमोर अशी काही प्रकरणं येतात ज्यांच्याबद्दल ऐकून त्यावर विश्वास ठेवावा की नाही असाच प्रश्न पडतो. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. ज्याबद्दल ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल. खरंतर एक नवरा आपल्या बायकोला चार वर्षापासून होर्मोनल इंजेक्शन देत होता ज्यामुळे त्याची बायको तरुणपणातच म्हातारी झाली. पण तो हे सगळं ज्या कारणासाठी करत होता ते कारण ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. हे प्रकरण बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील आहे. नवऱ्याने बायकोला सतत दिलेल्या हार्मोनल इंजेक्शन्समुळे, 25 वर्षीय महिलेचं शरीर तिच्या वर्षांहून अधिक वाढले आणि तिच्या चेहऱ्यावरील केस असामान्यपणे वाढले.
हॉटेल रुममध्ये ‘ही’ वस्तू दिसली तर लगेच सावध व्हा, ती सामान्य नाही तर एक छुपा कॅमेरा
माहितीनुसार, या व्यक्तीचे आपल्या वहिनीसोबत अवैध संबंध होते. लग्नानंतर लगेचच त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर, त्याने तिच्या शरीरात हार्मोन्स इंजेक्शन टोचण्यास सुरुवात केली ज्यामुळे तिच्या शरीरात गुंतागुंत निर्माण झाली. अत्याचार सुरूच असताना महिलेने तिच्या पालकांकडे तक्रार केली पण आरोपींनी तिला पाटणाच्या बिहटा ब्लॉकमध्ये एका नातेवाईकाच्या घरी डांबून ठेवले. पीडितेच्या भावाच्या म्हणण्यानुसार, आरोपीने गेल्या 8 महिन्यांपासून त्याच्या बहिणीबद्दल कोणतीही माहिती दिली नव्हती. बराच शोध घेतल्यानंतर त्याला बिहटा येथील जागा शोधण्यात यश आले आणि त्याने आपल्या बहिणीची सुटका केली. पीडितेला अत्यंत वाईट अवस्थेत पीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले आहे. उदवंत नगर पोलीस स्टेशन भोजपूरचे एसएचओ बैजनाथ चौधरी म्हणाले, “आम्ही बक्सर आणि भोजपूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार एफआयआर नोंदवला आहे आणि महिलेची सुटका केली आहे आणि तिला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *