‘बीड पॅटर्न’चा देशात डंका, रवीनं मिळवले 720 पैकी 700 गुण, Video – News18 लोकमत

[ad_1]
रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 14 जून: नुकताच नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत नेहमीच कोटा आणि लातूर पॅटर्नची देशभर चर्चा असते. मात्र, यंदा बीड पॅटर्न हिट ठरला आहे.
बीडमधील
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाच्या मुलानं नीट परीक्षेत 720 पैकी तब्बल 700 गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे रवी महेश सातपुते यानं कोणत्याही नावाजलेल्या पॅटर्नची ट्युशन न लावता अभ्यास करून हे यश मिळवलंय. त्यामुळे त्याच्या यशाची सर्वत्र चर्चा असून त्याला भारतातील नामांकित मेडिकल कॉलेज ‘एम्स’मध्ये प्रवेश मिळेल अशी खात्री वाटतेय. बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचं मोठं यश बीड जिल्हा हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. बहुतांश ग्रामीण असणारा जिल्हा आता शैक्षणिक क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आहे. नीट सारख्या परीक्षेत नेहमीच मराठवाड्यातील लातूर पॅटर्नची चर्चा असते. मात्र, यंदा बीडमधील उमा किरण संकुलात शिकणाऱ्या 50 हून अधिक विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न साकार होणार आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश मुलं ही ऊसतोड मजुरांची आहेत.
News18लोकमत
रवी सातपुते याचं यश रवी सातपुते यानं बीड जिल्ह्याचं नाव देश पातळवीवर पोहोचवलं आहे. रवीनं नीट परीक्षेत 720 पैकी तब्बल 700 गुण प्राप्त केले आहेत. रवीचे वडील महेश सातुपते जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. बीडमधील बालपीर परिसरात ते वास्तव्यास आहेत. लहानपणापासूनच हुशार असणाऱ्या रवीचं डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं. तरीही त्यानं लातूर किंवा कोटा सारख्या ट्युशन केंद्राच्या ठिकाणी जावून लाखो रुपयांची ट्युशन लावण्याऐवजी बीडमध्ये राहूनच अभ्यासाला प्राधान्य दिलं.
पहिली ते दहावीपर्यंत शाळेतच गेली नाही! आज आहे कॅालेजमध्ये, कसं काय? SPECIAL VIDEO
‘एम्स’मध्ये प्रवेशाचं स्वप्न पूर्ण होईल रवी सातपुते याचं भारतातील नामांकित मेडिकल कॉलेज ‘एम्स’मध्ये प्रवेशाचं स्वप्न होतं. आता चांगले गुण मिळाल्यानं हे स्वप्न पूर्ण होईल, असं रवी सांगतो. अभ्यासाच्या बळावर हे यश मिळवलं आहे. कष्ट केलं की यश मिळतं. त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. पालकांनी विद्यार्थ्यांना फोर्स करू नये, असं रवी सांगतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link