बेडरूम आणि किचनमध्ये अजिबात करू नका या चुका, अन्यथा दारिद्र्याला द्याल आमंत्रण

[ad_1]

मुंबई, 18 जुलै: प्रत्येक व्यक्तीच्या आत चांगल्या-वाईट सवयी असतात, पण कधी कधी असे घडते की जाणूनबुजून किंवा नकळत त्या सवयी आपले नुकसान करतात. नकळत आपण चुका करतो पण वास्तुनुसार या चुका आपल्याला आर्थिकदृष्ट्या कमकुवत बनवतात.

News18लोकमत


News18लोकमत

एवढेच नाही तर या चुकांमुळे घरात कलहही कायम राहतो. या छोट्या छोट्या गोष्टींचे विशेष महत्त्व वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे. वास्तुशास्त्रात अशा अनेक सवयी सांगितल्या आहेत ज्या चुकूनही पुन्हा करू नयेत. वास्तुशास्त्रानुसार बेडरूम आणि किचन हे दोन्ही घराचे महत्त्वाचे भाग आहेत. अशा परिस्थितीत स्वयंपाकघर आणि बेडरूमशी संबंधित चुका तुम्हाला गरीब बनवू शकतात. एवढेच नाही तर नात्यातही वितुष्ट येते. चला जाणून घेऊया अशा कोणत्या चुका आहेत ज्या टाळल्या पाहिजेत. Silver Ring Benefits: चांदीच्या अंगठीचे 5 आध्यात्मिक फायदे, शरीराबरोबरच मनालाही मिळते शांतता बेडरूमशी संबंधित वाईट सवयी अनेकदा लोक बेडरूमचा वापर जेवणाची खोली म्हणून करतात. म्हणजे लोक अनेकदा बेडवर बसून खातात. वास्तुशास्त्रानुसार, पलंगावर बसून जेवण करण्याची सवय चुकीची आहे. असे केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते. याशिवाय गलिच्छ पलंगावर झोपल्याने रात्री वाईट स्वप्नेही पडतात आणि धनहानीदेखील होते. कधीकधी, आपण चहा किंवा कॉफीचा कप बेडसाइड टेबलवर, बेडजवळ सोडतो. तुमच्या पलंगावर किंवा खोलीत न धुतलेले भांडी ठेवू नका. अन्यथा, यामुळे गरिबी येऊ शकते. यामुळे सहसा घरात नकारात्मक ऊर्जा संचारते. रुद्राक्ष धारण केल्यास चुकूनही करू नका हे काम अन्यथा महादेवाची… वास्तुशास्त्रानुसार वर्तमानपत्र किंवा पुस्तकांशी संबंधित कोणतीही गोष्ट उशीखाली ठेवू नका. अशा गोष्टी डोक्याखाली ठेवल्याने जीवनात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. असे लोक आयुष्यात कधीच प्रगती करू शकत नाहीत. स्वयंपाकघराशी संबंधित वाईट सवयी वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात अन्न खाऊ नये. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने स्वयंपाकघर खोटे होते आणि माता लक्ष्मीचा कोप होतो. त्यामुळेच जागेची अडचण असेल तर स्वयंपाकघरापासून थोडं लांब बसून खा. स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवल्याने माता अन्नपूर्णा नाराज होते. म्हणून, झोपण्यापूर्वी, स्वयंपाकघर स्वच्छ करा आणि घाण भांडी स्वच्छ करा. काही कारणास्तव तुम्ही रात्री भांडी धुवू शकत नसाल तर भांड्यांमध्ये पाणी टाकून ठेवा. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात मंदिर बनवू नये. स्वयंपाकघरात तामसिक अन्न शिजवल्याने नकारात्मक ऊर्जा संचारते आणि देवी लक्ष्मीची अवकृपा होते. या 3 राशींचे उजळणार नशीब, 25 जुलैला बुध ग्रहाचे सिंह राशीत संक्रमण वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरासमोर बाथरूम कधीही बनवू नये. किचन-बाथरूम समोरासमोर असण्याने मोठा वास्तुदोष निर्माण होतो आणि घरातील लोकांचे पैसे कमी होतात. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *