मोसंबीची शेती खरंच नफा देते का? कसं करायचं नियोजन? – News18 लोकमत

[ad_1]

बीड, 12 जुलै: मराठवाड्यातील बहुतांश शेतकरी सध्या फळबागाची शेती करत आहेत. मात्र योग्य नियोजन आणि वातावरणात होणारा बदल यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो. त्यातच मोसंबी फळबागाची शेती करताना लागवडीपासून ते काढणीपर्यंत नेमकी काय काळजी घेतली पाहिजे. वातावरणातील होणारा बदल यामुळे मोसंबी फळबागावर नव्याने पडणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत
बीडमधील
कृषी अभ्यासक रामेश्वर चंडक यांनी माहिती दिली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा मोसंबी शेतीकडे कल मागील दोन वर्षांपासून मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोसंबीच्या लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बाजारपेठेत मोसंबीला मोठ्या प्रमाणात मिळणारा दर व इतर बाबींमुळेच आता अनेक शेतकरी मोसंबी लागवडीकडे वळत आहेत. मात्र, ही मोसंबीची लागवड करताना योग्य ती काळजी घेण्याची गरज असते.

News18लोकमत


News18लोकमत

मोसंबीची लागवड कशी कराल? मोसंबीची लागवड करण्याच्या अनेक पद्धती आहेत. सध्या मात्र कृषी क्षेत्रातल्या नियमाप्रमाणे 20×20 अंतरावर मोसंबीची लागवड करणे योग्य आहे. 20×20 अंतरावर लागवड केल्यास एकरी 210 झाडे एकूण बसतात. झाडाला जास्त कालावधीसाठी उत्पादनशील ठेवायचा असेल तर 20×20 अंतरावरच लागवड करणे योग्य आहे. मोसंबीच्या झाडाच्या जातीची निवड करताना सालगुडी, न्युसेलर याच जातींची निवड करावी कारण या सर्वोत्तम आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती आहेत. मोसंबी कलमे प्रत्यक्ष लावलेल्या जागेवर घ्यावे. कलमे सरळ वाढलेली जोमदार वाढलेली आणि ताजे असावी. कलमे ही रोगमुक्त आणि बुरशी लागलेली नसावी. कलमांची उंची ही जमिनीपासून 2 ते 3 फूट असावी. डोळा लावलेला भाग हा जमिनीपासून 23-30 सेमी उंच असावा. मोसंबीची कलमे सरकारी किंवा नोंदणीकृत रोप वाटिकेतून खरेदी करावीत.
सातासमुद्रापार बीडच्या फळांना मोठी मागणी, शेतकऱ्यांनी कमी पाण्यात करून दाखवला करिष्मा
मोसंबीसाठी पाणी व्यवस्थापन ठिबक पद्धतीने मोसंबीच्या झाडांना पाणी व खते दिल्यास अधिक फायदेशीर ठरते. पावसाळ्यात पाऊसाचा खंड पडल्यास 13 दिवसातून एकदा पाणी द्यावे. हिवाळ्यात 11 ते 14 दिवसाने पाणी द्यावे. उन्हाळ्यात 6 ते 11 दिवसाच्या फरकाने पाणी द्यावे. मोसंबी खत व्यवस्थापन 1 ते 4 वर्षापर्यंत मोसंबीच्या प्रति झाडासाठी खालील प्रमाणे रासायनीक खते द्यावीत. 1ले वर्ष – 125 ग्रॅम: 125 ग्रॅम: 125 ग्रॅम (नत्र:स्‍फूरद:पालाश) 2ले वर्ष – 250 ग्रॅम: 250 ग्रॅम:250 ग्रॅम (नत्र:स्‍फूरद:पालाश) 3रे वर्ष – 500 ग्रॅम: 250 ग्रॅम:250 ग्रॅम (नत्र:स्‍फूरद:पालाश) 4थे वर्ष – 500 ग्रॅम: 250 ग्रॅम:250 ग्रॅम (नत्र:स्‍फूरद:पालाश)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *