या राज्यात आहेत सर्वाधिक कुलुपबंद घरं; निसर्गरम्य असूनही काय आहे कारण? – News18 लोकमत

[ad_1]

पणजी, 22 सप्टेंबर: सुंदर समुद्रकिनारे, हिरवागार रमणीय परिसर, स्वच्छ हवा अशी वैशिष्ट्यं असलेलं गोवा (Goa) राज्य हे देशातलंच नव्हे, तर परदेशातल्याही पर्यटकांचं (Best tourist spot in India) आवडते ठिकाण आहे. बॉलिवूड स्टार्स, सेलेब्रिटीज, अन्य क्षेत्रातल्या बड्या व्यक्ती यांचंही गोवा हे आवडतं ठिकाण आहे. सुशेगाद म्हणजे निवांत, कोणतीही घाई-गडबड नसलेली इथली जीवनशैली अनेकांना भुरळ घालते. त्यामुळे मुंबई, दिल्ली, पुणे अशा बड्या शहरांमधल्या धकाधकीच्या आयुष्याला कंटाळलेले नागरिक निवृत्तीनंतर आयुष्याच्या संध्याकाळी गोव्यात उर्वरित आयुष्य आनंदानं घालवायचं असं स्वप्न बघत असतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून अशा नागरिकांनी गोव्यात घर (Real Estate investment in Goa) घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे गोव्यात रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्राची चांगलीच भरभराट झाली आहे. गोव्यात घर घेणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने बंद घरांचं प्रमाणही मोठं आहे. लोकसंख्येच्या तुलनेत देशात सर्वाधिक कुलूपबंद घरांचं (Locked Houses in India) प्रमाण गोव्यात असल्याचं जनगणनेच्या अहवालावरून स्पष्ट झालं आहे. जनगणना विभागाच्या (Census Report) अहवालानुसार, गोव्यात 8 हजार बंद घरं आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांच्या तुलनेत ही संख्या खूप कमी आहे. तमिळनाडूमध्ये 1 लाख 62 हजार आणि उत्तर प्रदेशात एक लाख 27 हजार घरं बंद आहेत; पण लोकसंख्येच्या तुलनेत बंद घरांचा आकडा पाहिला तर गोवा इतर सर्व राज्यांपेक्षा आघाडीवर आहे.

Explainer: मुंबई, गोवाच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळले काळे चिकट गोळे, नक्की काय आहे हे आणि किती धोकादायक?

 लोकसंख्येच्या तुलनेत बंद घरांचं प्रमाण बघितले तर गोव्यातली सुमारे 1.4 टक्के घरं कुलूपबंद म्हणजेच ‘ऑक्युपाइड लॉक हाउस’ (Occupied Lock House) श्रेणीतली आहेत. लक्षद्वीप आणि मेघालयमध्ये 1.1 टक्के बंद घरं असून, बंद घरांच्या यादीत त्यांचा दुसरा क्रमांक आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानसारख्या मोठ्या राज्यांमधले नागरिक कामाच्या शोधात मोठ्या शहरांकडे जातात. तिथंही बंद घरांची टक्केवारी खूप कमी आहे. आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात हे प्रमाण 0.5 टक्क्यांपेक्षा कमी आहे. 2001 ते 2011 दरम्यान गोव्यात नवीन घरांची संख्या 25 टक्क्यांनी वाढली. मध्य प्रदेशात हे प्रमाण 31 टक्के, तर राजस्थानमध्ये 39 टक्के आणि बिहारमध्ये 43 टक्के होते.

खूशखबर! होम आणि कार लोनवरील EMI होणार कमी, SBI-PNB नंतर या बँकेने घटवले व्याजदर

मडगावमधले प्रॉपर्टी एजंट (Property Agent) हर्ष नायक यांच्या मते, गोव्यात बंद घरांचं प्रमाण अधिक असण्यामागे विविध कारणं आहेत. आपलं हक्काचे घर आपल्या गावात असलं पाहिजे अशी गोव्यातल्या नागरिकांची भूमिका आहे. त्यामुळे इथले असंख्य नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त अनेक वर्षं राज्याबाहेर, देशाबाहेर असले, तरी एक तरी घर गोव्यात असण्याकडे त्यांचा कल असतो. तसंच दिल्ली, मुंबई अशा अनेक ठिकाणच्या नागरिकांना गोवा आवडतो. त्यामुळं त्यांना इथं सारखं येत-जात राहायचं असतं. त्यामुळे ते गोव्यात स्वतःचं घर घेतात. ते राहायला येतात तेव्हा ते घर उघडलं जातं. एरव्ही ते बंद असतं. अशा नागरिकांची संख्याही मोठी आहे. निवृत्तीनंतर इथं स्थायिक होण्याच्या दृष्टीने घर घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशा विविध कारणांमुळे गोव्यात घरांची मागणी सतत असते; मात्र लोकसंख्येच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घरं बंद असतात. गोव्यात गेल्या दहा वर्षांत घरांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत तिप्पट होती. मध्य प्रदेशमध्ये हे प्रमाण दीडपट, तर राजस्थानमध्ये हे प्रमाण दुपटीपेक्षा थोडं कमी वाढलं आहे. जनगणनेच्या आकडेवारीनुसार, गोव्यातली 76 टक्के घरं चांगल्या स्थितीत आहेत. लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीमध्ये हे प्रमाण अनुक्रमे 78 आणि 75 टक्के आहे. उत्तर प्रदेशमध्ये हे प्रमाण 54 टक्के, बिहारमध्ये 36 टक्के आणि ओडिशामध्ये 29 टक्के आहे.
Explainer – 60% लसीकरणानंतरही केरळात कोरोना ‘जैसे थे’! काय आहे यामागील कारण?
कोरोना संकटामुळे (Corona Pandemic) रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मागणी कमी झाली असून, पुरवठाही कमी आहे. आता स्थिती हळूहळू सुधारत असली तरी ती पुन्हा पूर्वीसारखी होण्याकरिता आणखी काही काळ जावा लागणार आहे. गोव्यातही घरांची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती फार बदलण्याची शक्यता नाही. त्यामुळे इथं आता घरं भाड्यानं (Rental Houses) देण्याचा व्यवसाय अधिक फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *