रेल्वेने केली भाडे कपातीची घोषणा! 25% स्वस्त झालं ट्रेनचं तिकीट – News18 लोकमत

[ad_1]
रेल्वे मंत्रालयाने अनुभूती आणि विस्टाडोम डब्यांसह एसी सीटिंग सुविधा असलेल्या सर्व ट्रेनच्या एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये सवलत योजना सुरू केली आहे.
मूळ भाड्यावर कमाल 25% पर्यंत सूट असेल. लागू असलेले इतर शुल्क स्वतंत्रपणे आकारले जातील.
ज्या गाड्यांमध्ये प्रवासी संख्या कमी असेल त्यांना ही सवलत लागू होईल.
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ही सवलत अशा ट्रेनमध्ये दिली जाईल ज्यामध्ये संपूर्ण प्रवासादरम्यान किंवा एखाद्या विशिष्ट विभागात प्रवाशांची संख्या क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी असेल.
यासाठी गेल्या 30 दिवसांत प्रवाशांची वाहतूक पाहिली जाईल आणि सरासरी 50 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या गाड्यांच्या तिकिटांवर सवलत दिली जाईल. या योजनेमुळे या गाड्यांमधील प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
[ad_2]
Source link