लांडोर आणि पोलिसांची अनोखी मैत्री; लोक म्हणतात, हे तर…

[ad_1]

उमेश अवस्थी, प्रतिनिधी औरैया, 28 जुलै : आपण प्राणीप्रेमाच्या अनेक कथा ऐकतो, पाहतो, अनुभवतो. पाळीव प्राण्यांवर जवळपास सर्वचजण प्रेम करतात. मात्र फार कमी लोक असे असतात, जे जलचर, भूचर अशा सर्व प्राण्यांना जीव लावतात. उत्तर प्रदेशच्या औरैया जिल्ह्यातून अशीच एक अनोखी मैत्री समोर आली आहे. ही मैत्री आहे पोलीस आणि लांडोरची. चार महिन्यांपूर्वी झालेल्या या मैत्रीची सुरुवातही अतिशय रोमांचक आहे. एकदा काय झालं…पोलीस अधिकारी राजपाल सिंह यांनी लांडोरला स्वतःच्या हाताने डाळ भरवली. मग काय…तिला याची सवयच झाली आणि आता दररोज त्यांच्या हातून खायला आवडू लागलं आहे.

News18लोकमत


News18लोकमत

राजपाल सिंह जेव्हा कामावरून संध्याकाळी त्यांच्या सरकारी निवासात परततात तेव्हा लांडोर स्वतःच त्यांच्याजवळ येते. ती त्यांच्या हातून काही खात नाही, तोपर्यंत तिथून कुठेच जात नाही. यातून त्यांची मैत्री दिवसेंदिवस आणखी घट्ट होऊ लागली आहे. विशेष म्हणजे कधी कधी लांडोर स्वतः त्यांच्या गाडीतही जाऊन बसते आणि सुंदररीत्या पिसारा फुलवून नाचते. या मैत्रीचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. शिवाय ही मैत्री कसब्यापासून जनपदपर्यंत चर्चेत आहे. या दोघांचं मागच्या जन्मीचं काहीतरी नातं असावं, असं लोक बोलू लागले आहेत.
नागापेक्षाही खतरनाक आणि कोब्रापेक्षा 4 पट विषारी आहे ‘हा’ साप
राजपाल सिंह यांच्याशी याबाबत चर्चा केली असता, त्यांनी सांगितलं, ‘लांडोर स्वतः माझ्याजवळ येते आणि माझ्या हातून काहीना काहीतरी खाते. कधीकधी घरी येऊन पिसारा फुलवून नाचते, तर कधी गाडीसमोर येऊन नाचू लागते.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *