विद्यार्थी झाले कॅशियर, मॅनेजर, चक्क शाळेनं सुरू केली बॅंक, पाहा कसं चालतं कामकाज – News18 लोकमत

[ad_1]

भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी  डोंबिवली , 23 जून :   प्रत्येक शाळा आणि शिक्षक आपल्या शाळेतून उत्तम विद्यार्थी घडावे यासाठी प्रयत्न करत असतात. विद्यार्थी कितीही मोठे झाले तरी शाळेत दिलेले शिक्षण ते विसरत नाहीत. लहानपणापासून विद्यार्थ्यांना चांगली सवय लागावी यासाठी
डोंबिवलीतील
जन गण मन या शाळेने शाळेतच सेव्हिंग बँक सुरू केली आहे. या छोट्याशा बँकेत विद्यार्थी कॅशियर, टेलर, मॅनेजर अशी वेगवेगळी कामं करतात. काय आहे उद्देश? शाळेतून बाहेर पडताना त्यांनी कोणत्याही ठिकाणी कमी पडू नये या विचारानेच हे उपक्रम राबवत असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका प्रेरणा कोल्हे यांनी सांगितलं. या बँकेत विद्यार्थ्यांना 10 रुपयांमध्ये खातं उघडता येतं. ही बँक सुरू करण्याआधी युनियन बँकेशी आमचं बोलणं झालं. त्यांना ही संकल्पना खूप आवडली. मुलांची ही बँक डोंबिवली पश्चिम येथील युनियन बँकेशी संलग्न आहे,’ असं कोल्हे यांनी स्पष्ट केलं.

News18लोकमत


News18लोकमत

3 जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती असते. याच दिवसाचं औचित्य साधून शाळेत ही छोटी बँक सुरू झाली. शाळेने एक पासबुक दिले असून एक पास बुक युनियन बँकेचे आहे. विद्यार्थ्यांनी पैसे दिल्यानंतर टेलर असलेला विद्यार्थी शाळेच्या पास बुकवर आणि संगणकावर नोंद करतो. ही नोंद नंतर बँकेच्या पासबुकमध्ये केली जाते.
इंजिनिअर तरुण बनला डोंबिवलीचा ‘लाडू सम्राट’, एकाच ठिकाणी मिळतात 50 प्रकार
बँकेचे अधिकारी महिन्यातून एकदा या सर्व खात्यांचं परीक्षण करतात. सोमवार आणि गुरुवार अशी आठवड्यातील दोन दिवस ही बँक सुरू असते. शाळेनं हा उपक्रम सुरू केलाय, त्यामध्ये सहभागी झाल्याचा आनंद आहे, अशी भावना विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केलीय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *