वृषभ राशीच्या व्यक्तींना जुलै महिन्यात असतील अनेक सरप्राईज, पाहा कसा जाणार महिना – News18 लोकमत

[ad_1]
डोंबिवली 1 जुलै : नवा महिना आपल्याला कसा जाणार? याची उत्सुकता प्रत्येकाला असते. सध्या चातुर्मास सुरू झाला आहे. या चातुर्मासात येणारा जुलै महिना वृषभ राशीला कसा जाणार या संदर्भात
डोंबिवलीतील
ज्योतिषी प्रवीण गोरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कसा असेल महिना? वृषभ ही शुक्राची रास आहे. या राशीची व्यक्ती सहनशील असते. सौंदर्य, फिरणे या सगळ्या गोष्टींची त्याला आवड असते.या 30 जूनला शुक्र सिंह राशीत आहेत. मंगळ आणि शुक्र या दोघांची युती झाल्याने जमीन जुमला , प्रॉपर्टी खरेदी करू शकतात. लाभ स्थानात शनी असल्याने प्रत्येक कामात उशीर होणार आहे. 1 ते 4 पासून त्यांना दिवस चांगले आहेत. त्यांना प्रत्येक प्रश्न चर्चा करून सोडवायचे आहेत.
News18लोकमत
कोणत्याही गोष्टीत भावनिक होऊ नये तसे केले तर लाभ होण्याची शक्यता आहे.संकटात हात न टेकता प्रसांगावधान राखून काम करणे गरजेचे आहे 17 जुलै ते 30 जुलै त्यांना लाभदायक ठरू शकतात, असं गोरे यांनी सांगितलं.
गुरू पौर्णिमेच्या मुहूर्तावर करा ‘या’ गोष्टी, आयुष्यात सर्वार्थानं होईल उन्नती, Video
चातुर्मास सुरू झाला असून या महिन्यात अनेक योग तासेच ग्रहांची युती होणार आहे. त्यामुळे एकंदरीतच सर्व गोष्टी शांततेत विचार करून केल्या तर वृषभ राशीच्या व्यक्तींना हा महिना मिश्र फळ देईल असा अंदाज गोरे यांनी व्यक्त केलाय.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
[ad_2]
Source link