शनिदेव आणि शुक्राच्या युतीमुळे तयार होतोय ‘खप्पर योग’, या 3 राशींचे उजळेल भाग्य

[ad_1]

मुंबई, 22 जुलै:  अधिकमास सुरू झाला असून तो 16 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. या महिन्यात अनेक शुभ योग तयार होतील. त्यातील एक खप्पर योग आहे, हा योग पाच बुधवार आणि पाच गुरुवारसोबत शुक्र आणि शनि यांच्या प्रतिगामी गतीमुळे तयार होईल.

News18लोकमत


News18लोकमत

शनि आणि शुक्र यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे सर्व राशीच्या लोकांवर या योगाचा प्रभाव दिसून येईल. परंतु अशा 3 राशी आहेत, ज्यासाठी यावेळी अचानक आर्थिक लाभ आणि शुभयोग होत आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या भाग्यशाली राशी आहेत. मेष राशी खप्पर योग तयार झाल्याने मेष राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. यावेळी तुमचे उत्पन्न वाढू शकते. यासोबतच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. त्याच वेळी, तुमचे करिअर खूप चांगले होईल. कार्यक्षेत्रात खूप प्रगती कराल. तुम्ही कोणत्याही व्यवसायात असाल तरी तुमची आर्थिक प्रगती होईल. यासोबतच जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. दुसरीकडे, जर तुम्हाला स्टॉक मार्केट, बेटिंग आणि लॉटरीमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही ते करू शकता. Shani mantra: राशीनुसार शनिवारी या मंत्रांचा करावा जप; शनिदेवाची होते कृपा, साडेसाती टळते वृषभ राशी खप्पर योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुम्हाला नोकरी-व्यवसायात चांगले यश मिळू शकते. तसेच शुक्र आणि शनीची प्रतिगामी गती तुम्हाला नोकरी आणि व्यवसाय दोन्हीमध्ये यश देईल. तुम्हाला अचानक कुठूनही मोठा पैसा मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. नोकरदार लोकांना पदोन्नती किंवा पगारवाढ होऊ शकते. तसेच यावेळी तुम्हाला तुमच्या वडिलांची साथ मिळू शकते. त्याचबरोबर जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळू शकते. Gemstone For Zodiac: ही रत्ने दूर करतात ग्रहांचे अशुभ प्रभाव, राशीनुसार परिधान करण्याचे नियम मिथुन राशी खप्पर योग तयार झाल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. म्हणूनच यावेळी तुम्ही भाग्यवान होऊ शकता. तसेच यावेळी धर्म आणि कार्यात तुमची रुची वाढू शकते. प्रगतीच्या नवीन संधी दिसत आहेत ज्यामुळे तुम्हाला आर्थिक प्रगतीदेखील मिळू शकते. या राशीचे लोक जे सरकारी नोकरीच्या तयारीत आहेत त्यांना नोकरी मिळू शकते. यासोबतच शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या सुखाची साधनेही वाढतील आणि घरामध्ये खर्चही होईल. दुसरीकडे, ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *