सापासारखी दिसणारी ही भाजी, चव आणि प्रोटीनने आहे भरपूर, पीक घेतलेला शेतकरी झाला मालामाल

[ad_1]

पूर्वी चम्पारण, 29 जुलै : आज तुम्हाला अशी भाजी सांगणार आहोत जी भाजी शेतात सापासारखी लटकते. पण ही भाजी चवीला देखील स्वादिष्ट असून प्रोटीनने देखील भरपूर आहे, या भाजीला मराठीत ‘पडवळ’ असे म्हंटले जाते. बिहारच्या पूर्व चम्पारांच्या येथील मथुरापूर पंचायत अंतर्गत अमवा गावात राहणारे शेतकरी विजय कुमार यांनी त्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर ‘पडवळ’ च्या भाजीची लागवड केली आहे. शेतकरी विजय यांनी सुरुवातीला एका लहान प्लॉटवर पडवळची शेती केली होती. त्यातून 4 ते 5 दिवसात जवळपास 15 ते 20 किलो पडवळचे उत्पादन मिळत आहे. तर महिन्याला तब्बल सव्वा क्विंटल उत्पादन मिळत आहे. शेतकऱ्याने सांगितले की त्यांनी ही शेती करण्यासाठी स्थानिक बाजारात मिळणाऱ्या बियांचा वापर केला होता. याबियांची लागवड त्यांनी एप्रिल महिन्यात केली तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून यातून उत्पादन येणे सुरु झाले. यासाठी केवळ 5  हजार रुपये इतका खर्च आला.

News18लोकमत


News18लोकमत

फक्त जंगलात मिळते ही भाजी, जबरदस्त पौष्टिक गुण… पण भाव किती माहितीए का?
महिन्याला 25 हजारांची कमाई : विजय यांच्या शेतातील पडवळ ही बाजारात 20 ते 25 रुपये किलो भावाने विकली जाते. तर महिन्याला यातून शेतकऱ्याला सुमारे 25 हजार रुपये मिळतात. जर कोणत्या शेतकऱ्याने मोठ्या जागेत पडवळची शेती केली तर तो उत्पादनानुसार महिना दीड लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकेल. पडवळ ही जवळपास दोन फूट लांब असते. पडवळ चवीला देखील खूपच चांगली असून प्रोटीनने भरपूर असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *