सोन्या-चांदीच्या दरात झाली वाढ, पाहा आजचा भाव काय? – News18 लोकमत

[ad_1]
Gold Silver Price Today: आज, 14 जुलै 2023 रोजी, भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे.
सोन्याचा भाव 59 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचवेळी, चांदीचा भाव 74 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे.
राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 59352 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 74953 रुपये आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव गुरुवारी संध्याकाळी 59,329 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज सकाळी 59,352 रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारावर सोने-चांदी महाग झाली आहे.
गुरुवारी संध्याकाळी 999 शुद्धतेच्या चांदीचा दर 73592 होता. जो आज शुक्रवारी 74953 झाला आहे. म्हणजेच चांदी 1,361 रुपयांनी महागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
[ad_2]
Source link