हापूसला द्यायची टक्कर, आताच ठरवा आणि या आंब्याची करा लागवड

[ad_1]

बीड, 19 जुलै: भारतात आंब्याला फळांचा राजा असे म्हटले जाते. भारतीय फळ बाजारात आंब्याची मागणी खूप जास्त आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बहुतांश लोकांना आंब्याचा रस खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये सर्वाधिक आंब्याची उलाढाल होत असते. भारतामध्ये विविध प्रजातींच्या आंब्याची झाडे लावली जातात. मात्र, ही आमराई लावताना योग्य काळजी घेण्याची गरज आहे. याबाबतच
बीडमधील
कृषी तज्ज्ञ रामेश्वर चांडक यांनी माहिती दिली आहे. शेतकऱ्यांचा फळ शेतीकडे कल पारंपारिक शेतीला फाटा देत अनेक शेतकरी आता फळशेती करत आहेत. फळांच्या शेतीतून कमी कालावधीमध्ये अधिक उत्पन्न मिळत असते. वेगवेगळ्या ऋतूनुसार वेगवेगळ्या फळांची मागणी असते. त्यानुसारच अनेक शेतकरी वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळ्या फळांची लागवड करत असतात. यातच फळांचा राजा मानला जाणारा आंबा सर्वांच्या आवडीचे फळ आहे. बाजारात मागणी असल्याने आंब्याची शेती फायदेशीर ठरते.

News18लोकमत


News18लोकमत

केशर आंब्याची लागवड कशा पद्धतीने कराल? महाराष्ट्रामध्ये विविध प्रजातींच्या आंब्याची लागवड केली जाते. यामध्येच सर्वाधिक लागवड ही केशर आंब्याची होत असते. केशर आंब्याची लागवड ही 12 ×6 यासह 15 × 6 याच अंतरावर करावी किंवा चौरस लागवड करायची असेल तर 12×12 हे लागवडीचे सर्वोत्तम अंतर राहील. लागवड अंतर ठरवताना त्याची छाटणी व्यवस्थापनावर देखील लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. ज्या अंतरावर तुम्हाला केशर आंब्याची लागवड करायची आहे ही लागवड दक्षिण उत्तर होणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून मशागत करताना सोपे जाईल आणि झाडांना सूर्यप्रकाश मिळेल. सूर्यप्रकाश गरजेचा आंब्याच्या झाडांना दोन्ही बाजूंनी सूर्यप्रकाश मिळणे गरजेचे असते. झाडांना फळधारणा करणं, झांडाची वाढ करून घेणं, झाडांच्या फांद्या बाहेरच्या बाजूला काढणं, यासाठी दोन्ही बाजूंचा सूर्यप्रकाश झाडांना आवश्यक आहे. लागवड करताना एक ते दीड फुटाची चर काढणे आवश्यक आहे. या चरामध्ये संपूर्ण सेंद्रिय खत, लिंबोळी, कीटकनाशक एकत्र करून त्या चरामध्ये भरून घ्यायचे आहे.
कमी खर्चात लाखोंचा नफा; भरघोस उत्पन्न देणाऱ्या पेरू शेतीचे लागवड तंत्र
लागवडीसाठी उत्तम जमीन कोणती? आंब्याच्या लागवडीसाठी सर्वात योग्य जमीन ही चिकणमातीची आहे. परंतु त्याची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत शक्य आहे. जर थोडी कोरडी किंवा कडक माती असेल तर त्यातही आंब्याची बाग लावली जाऊ शकते. पावसाळ्यात आपल्या शेतात पाणी साचणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. तसेच, पावसाळ्यात पाणी शेताबाहेर काढण्यासाठी ड्रेनेजची उत्तम व्यवस्था असावी. आंबा पिकाला आंशिक पाणी दिले पाहिजे. शक्य असल्यास, बागेत ठिबक सिंचन प्रणालीच बसवा. जेणेकरून झाडांसाठी अधिक प्रभावी पद्धतीने पाणी देता येईल. ठिबक सिंचन झाडाला अधिक फायदा देते. आंबा लागावाडीचा हंगाम नेमका कोणता? जून महिन्यात आंब्याची लागवड करणे चांगले. जून मध्ये 4 ते 6 इंच पाऊस झाल्यानंतर खड्डे तयार करा. खड्डा तयार केल्यानंतर आंब्याची रोपे लावा. 15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान आंबा कधीही लावू नये. कारण हा काळ संपूर्ण पावसाळ्याचा असतो. पावसाळ्यात आंब्याची लागवड करू नका. जर पुरेसे पाणी उपलब्ध असेल तर आपण फेब्रुवारी-मार्च महिन्यात आंब्याची लागवड करू शकता. या काळात लागवड केली तर उत्पादन चांगले येते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *