पावसाळ्यात पालकाचे भज्जे खाताय? पण शेती कशी होते माहितीये का? कशी होते पेरणी? VIDEO

[ad_1]

बीड, 27 जुलै: सध्याच्या काळात अनेक शेतकरी तरकारी पिकांच्या शेतीकडे वळत आहेत. कमी काळात चांगले उत्पन्न देणाऱ्या शेती पिकांना शेतकरी प्राधान्य देत आहेत. असेच बारमाही पीक म्हणून पालक भाजीच्या शेतीकडे पाहिले जाते. तिन्ही ऋतूत येणारी पालक सर्वांच्या स्वयंपाक घरातील भाजी आहे. त्यामुळे पालकाची शेती फायदेशीर ठरते. पालकाची शेती कशी करावी? कधी करावी? आणि त्याचे व्यवस्थापन कसे असावे? याबाबत
बीडमधील
कृषी अभ्यासक रामेश्वर चांडक यांनी माहिती दिली आहे. तिन्ही ऋतूत येणारी औषधी भाजी पालक ही रोजच्या आहारातील प्रमुख भाजी आहे. त्यामुळेच पालक भजीपासून विविध पदार्थ लोक आवडीने खातात. आरोग्याच्या दृष्टीनेही पालकाचे महत्त्व आहे. तसेच ही भाजी सर्व हंगामात आणि सर्व ऋतूत येते. सर्व काळात मागणी असल्याने बाजारात भावही चांगला मिळतो. त्यामुळे शेतकरी तरकारी पीक घेताना पालक शेतीकडे वळतात. विशेष म्हणजे पालक शेतीसाठी लागवडीचा खर्च कमी येतो आणि उत्पन्न चांगले मिळते. मात्र, ही शेती करताना त्याचे व्यवस्थापन चांगले करणे गरजेचे आहे, असे कृषी अभ्यासक सांगतात.

News18लोकमत


News18लोकमत

कशी कराल पालकाची लागवड? महाराष्‍ट्रातील हवामानात पालकाची लागवड जवळ जवळ वर्षभर करता येते. खरीप हंगामातील लागवड जून – जूलैमध्ये आणि रब्‍बी हंगामातील लागवड सप्‍टेबर ऑक्‍टोबरमध्‍ये केली जाते. भाजीचा सतत पुरवठा होण्‍यासाठी 10 ते 15 दिवसांच्‍या अंतराने हप्‍त्‍या हप्‍त्‍याने बियांची पेरणी करावी. पालक हे कमी दिवसात तयार होणारे पीक असल्‍यामुळे जमिनीच्‍या मगदुरानुसार योग्‍य आकाराचे सपाट वाफे तयार करून बी फेकून पेरावे आणि नंतर बी मातीत मिसळून हलके पाणी द्यावे. जमीन भारी असल्‍यास वापसा आल्‍यावर पेरणी करावी, असा सल्ला चांडक देतात. लागवडीसाठी बियाण्याचे प्रमाण जर तुम्ही एक हेक्टर जमिनीत पालकाची लागवड करायला सुरुवात केली तर तुम्हाला 30 ते 32 किलो बियाणे लागतील. ज्यातून तुम्ही 150 ते 200 क्विंटलपर्यंत चांगले पीक घेऊ शकता. बी ओळीत पेरतांना दोन ओळीत 25-30 सेंटीमीटर अंतर ठेवावे. फार दाट लागवड केल्‍यास पिकाची वाढ कमजोर होवून पानांचा आकार लहान राहतो आणि पिकांचा दर्जा खालावतो, असे कृषी अभ्यासक चांडक सांगतात.
असा हा महाराष्ट्र आपला, अवघं गाव कपडे ही न मळवता करतंय शेती, वर्षांला आहे लाखोंची कमाई
पालकाच्या शेतीसाठी खताचे प्रमाण खताच्या मात्रेवर पिकाचे उत्पादन व प्रत अवलंबून असते. यामुळे पालकाच्या पिकाला नत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. तसेच पिकाला पाण्याचा नियमीत पुरवठा करून जमिनीत ओलावा राखणे आवश्यक आहे. पालकाच्या पिकाला हेक्टरी 20 गाड्या शेणखत, 150 किलो नत्र, 80 किलो स्फुरद, 80 किलो पालाश द्यावे. शेणखत पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत मिसळून द्यावे. संपूर्ण स्फुरद, पालाश आणि एक तृतियांश ( 1/3 ) नत्र पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेले नत्र दोन समान विभागातून पहिल्या आणि दुसऱ्या कापणीच्या वेळी द्यावे. ज्या जातींमध्ये दोनपेक्षा जास्त कापण्या करता येतात तेथे प्रत्येक कापणीनंतर हेक्टरी 20 किलो नत्र द्यावे, असे कृषी अभ्यासक रामेश्वर चांडक सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *