Investment Tips: Before investing in land, take care of these things, otherwise you will be in trouble mhsa

[ad_1]
मुंबई, 31 ऑगस्ट: भारतात अगदी प्राचीन काळापासून जमीन (Land) हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. जमीन जितकी जास्त तितकी व्यक्ती समृद्ध असं मानलं जातं. जमीन आणि समृद्धी हे समीकरण पुरातन काळापासून चालत आलं आहे. आज इतक्या वर्षांनंतरही यात बदल झालेला नाही. अनेक लोक जमिनीमध्ये गुंतवणूक **(**Investment in Land) करतात. गुंतवणूक तज्ज्ञ आशुतोष बिश्नोई म्हणतात की, देशातील मोठी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. जेव्हा आपण जमिनीतील गुंतवणुकीबद्दल बोलतो तेव्हा शेतकऱ्यांना विसरता येत नाही. याशिवाय बाकीचे लोक, जे शेती करत नाहीत पण तेही कोणत्या ना कोणत्या प्रकारे शेतीशी निगडीत आहेत. एक-दोन पिढीपूर्वी त्यांचे पूर्वजही शेतकरी होते. अशावेळी खेड्यापाड्यात त्यांच्यासाठी उत्पन्नाच्या संधी नसताना ते झपाट्याने स्थलांतरित होत आहेत. हे (भूमिहीन मजूर) शहराकडे जाऊ लागले असतील, पण आता शहरी लोकांचा जमिनीत रस वाढला आहे. जर तुम्हालाही जमिनीत रस असेल तर काही तथ्ये जाणून घेणं अधिक योग्य ठरेल. जमिनीत गुंतवणूक करण्यापूर्वी तीन बाबींवर मूल्यमापन करा शहरी गुंतवणूकदारांसाठी जमीन खरेदी करण्याचा पूर्णपणे वेगळा अर्थ आहे. काही विकासक जमिनीचा भाव वाढवतात. अगदी त्या जमिनीला वेगळं नाव देऊन त्याचं ब्रँडींगही केलं जातं. या पद्धतीद्वारे ते श्रीमंत खरेदीदारांना आकर्षित करण्यात गुंतले आहेत. हा ट्रेंड पाहण्यासारखा आहे. त्यात आव्हानं आहेत तशी संधीही आहेत. तुम्ही अशी जमीन खरेदी करण्याचा विचार करू इच्छित असल्यास, पुढे जाण्यापूर्वी या तीन घटकांचा विचार करा. याचा अर्थ तुम्ही जी जमीन खरेदी करणार आहात तिचे मूल्यमापन तीन मूलभूत बाबींवर केलं पाहिजे. सुरक्षितता, तरलता आणि परतावा. परंतु प्रथम, तुम्ही ती स्व-वापरासाठी विकत घेत आहात की गुंतवणूक म्हणून विकत घेत आहात हे ठरवावं लागेल. अन्यथा तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो. सुरक्षितता – तुम्ही जी जमीन खरेदी करणार आहात ती विक्रेत्याच्या मालकीची असावी. तुम्ही तुमच्या स्वत:च्या वापरासाठी जमीन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर स्थानिक पातळीवर तिची परिस्थिती समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण काही वेळा सामुदायिक गतिशीलतेमुळे (Community Dynamics) बाहेरील लोकांना जमिनीचा ताबा घेणं कठीण होते. हेही वाचा-
एजंट काही सेकंदात ट्रेनचं तिकीट बुक करतात, मग सर्वसामन्यांना का नाही जमत? काय आहे सगळा प्रकार?
लिक्विडिटीवर लक्ष ठेवा- जर तुम्ही गुंतवणुकीसाठी जमीन खरेदी करणार असाल तर तुम्ही तिच्या लिक्विडिटी विचार केला पाहिजे. कारण, जमीन विकताना तुम्हाला लिक्विडिटी समस्येचाही फटका बसू शकतो. काही वेळा जमिनीचे ग्राहक लगेच उपलब्ध होत नाहीत. ज्यांना रिअल इस्टेट गुंतवणुकीतून झटपट आणि अतिशय जलद लिक्विडिटी हवी आहे, त्यांनी रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REIT) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करणं उचित आहे. हे ट्रस्ट मुळात एखाद्या तज्ञ रिअल इस्टेट पोर्टफोलिओ व्यवस्थापकाद्वारे व्यवस्थापित केलेले फंड-सारखे कॉर्पस असतात आणि ते स्टॉक एक्सचेंजमध्ये देखील सूचीबद्ध आहेत. जमिनीला नेहमीच चांगला परतावा मिळत नाही- जमिनीत गुंतवणूक केल्यास उत्तम परतावा मिळतो असे अनेक लोक तुम्हाला सांगतात. हे नेहमीच खरं ठरेल असं नाही. आर्थिक गुंतवणुकीच्या तुलनेत भारतातील लागवडीखालील जमिनीतून मिळणारं उत्पादनही फारसं आकर्षक दिसत नाही. जर तुम्ही शेतकरी म्हणून जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक मूल्यांकन करणं आवश्यक आहे. जमिनीतून परताव्याचा दुसरा प्रकार म्हणजे भाडं. जर तुम्हाला स्थिर, पैसे देणारा आणि प्रामाणिक भाडेकरू सापडला तर हा एक चांगला सौदा असू शकतो. विकसित (Developed) की ब्रँडेड जमीन यावर काय निर्णय घ्यावा!- आता प्रश्न असा पडतो की, तुमच्याकडे आलेली ब्रँडेड जमिनीची ऑफर स्वीकारायची का? याबाबत तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की मी ब्रँडेड वस्तू (जमीन) खरेदी करण्यासाठी भरत असलेल्या प्रीमियमच्या बदल्यात मला काय मिळेल किंवा मिळू शकेल? हे एक स्व-मूल्यांकन असेल जे तुम्हाला प्रश्नांची उत्तरे मिळवून देईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link