असा हा महाराष्ट्र आपला, अवघं गाव कपडे ही न मळवता करतंय शेती, वर्षांला आहे लाखोंची कमाई

[ad_1]
छत्रपती संभाजीनगर, 26 जुलै : राज्यातील बहूतांश शेतकरी हे पारंपारिक शेती करतात. तर काही शेतकरी आपल्या शेतामध्ये नवीन तंत्राचा वापर करून वेगवेगळे प्रयोग करतांना पाहिला मिळतात. असंच काहीसं
छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील शेतकऱ्यांनी केलं आहे. या गावातील शेतकऱ्यांनी निवडलेला मार्ग अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. येथील शेतकऱ्यांनी पारंपारिक कृषी उत्पादने आणि रासायनिक खतांच्या अतिवापराचा धोका ओळखत रेशीम शेती सुरू केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी गावात रेशीम शेतीचा वापर करून केवळ उत्पादनच वाढवले नाही तर बेरोजगारांना रोजगारही दिला आहे. सध्या मराठवाडा हे रेशीम लागवडीचे प्रमुख केंद्र बनत असून येथील क्षेत्र वाढत आहे. रेशीम शेतीचा फायदा केकत जळगाव येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे. जवळपास 300 एकरात रेशीम लागवडीचा प्रयोग येथील शेतकऱ्यांनी केला आहे. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी कठोर परिश्रम आणि प्रगत पद्धतींवर अधिक भर दिला होता. रेशीम किड्यांचा बाजारभाव 500 ते 600 रुपये प्रतिकिलो आहे. रेशीमच्या उत्पादनातून त्यांना दरवर्षी सुमारे एक एकर क्षेत्रात 2 लाख 50 हजारांचा नफा मिळत आहे. त्यामुळे येथील शेतकरी रेशीम शेतीमधून मालामाल झाले आहेत.
News18लोकमत
रेशीम शेती यशस्वी केल्याबद्दल मिळाले 8 पुरस्कार शेतकरी संतोष वाघमारे आणि त्यांच्या पत्नी मंगलबाई वाघमारे यांनी या गावातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीचा नवा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे संतोष वाघमारे आणि मंगलबाई वाघमारे यांना वेगवगेळे पुरस्कार मिळाले आहेत. मंगलबाई वाघमारे यांचे रेशीम शेती मधील योगदान लक्षात घेऊन 2014 साली तात्कालिक केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री संतोषकुमार गंगवार यांच्या हस्ते ‘रेशम शेती उत्कृष्ट महिला’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी व पणन विभाग यांच्याकडून 2014 साली संतोष वाघमारे यांनाही तालुका कृषी विभागाकडून पुरस्कार देण्यात आला. तसेच भारत सरकार यांच्याकडून केंद्रीय रेशीम मंडळ केंद्रीय रेशीम उत्पादन संशोधन तथा प्रशिक्षण संस्था मन्सूर यांच्या वतीने रेशीम शेतीमध्ये 2015 ते 16 यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ‘रेशीम कृषक मेळवा 2016’हे प्रमाणपत्र पुरस्कृत करण्यात आले.
जालन्यातील शेतकऱ्यानं घेतलं मोसंबी शेतीमधून तब्बल 14 लाखांचे उत्पन्न, पाहा कसं केलं नियोजन Video
तर 2014 मध्ये महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात अभिनव उपक्रम राबवून प्रेरणादायी योगदान दिल्याबद्दल कृषी थाॅन या संस्थेतून गौरव करण्यात आला. 2015 मध्ये ग्रामराज्य शेतकरी पुरस्कार वाघमारे कुटुंबास देण्यात आला होता. 2014 मध्ये कुंभार भारत मासिक नागपूर यांच्यावतीने ‘डॉ. सॅम्युअल हॅनिमन उद्योगरत्न’ सन्मान हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तर सुभाष बापू देशमुख तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते 2019 रोजी उत्कृष्ट जिल्हा रेशीम उत्पादक शेतकरी हा पुरस्कार देण्यात आला आहे. लागवडीपासूनच योग्य ती काळजी रेशीम लागवडीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी लागवडीपासूनच योग्य ती काळजी घेतली. पाणी वेळेवर मिळावे म्हणून ठिबक सिंचनाची व्यवस्था केली आणि जलसंधारणही झाले. अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा अजिबात वापर केला नाही. शेतात सेंद्रिय खत आणि गांडूळ खताचा वापर केला. रेशीम शेतात शेतकरी बायको-मुलांसोबत राबतात. यावर्षी चांगला दर मिळाला असून कमाईही अधिक झाल्याचे येथील रेशीम उत्पादक शेतकरी संतोष वाघमारे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
[ad_2]
Source link