तुमचा फोन चोरी झालाय? मग घर बसल्या असा करा ब्लॉक, कोणी चुकीचा वापर करू शकणार नाही

[ad_1]

पंचकुला, 29 जुलै : आपला फोन चोरी झाल्यावर किंवा हरवल्यावर टेंशन येत. कोणी मोबाईलचा गैर वापर तर करणार नाही ना अशी भीती वाटू लागते. परंतु आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आता भारत सरकारने फोन चोरीच्या रिपोर्टसाठी CEIR पोर्टल सुरू केले आहे. CEIR पोर्टलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल तात्काळ ब्लॉक करू शकता जेणेकरून कोणीही फोनवरून तुमचा डेटा आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर करू शकणार नाही. याशिवाय सर्वसामान्य माणूस या पोर्टलवर घरबसल्या आपली तक्रार नोंदवू शकतो आणि त्याच्या तक्रारीची स्थितीही जाणून घेऊ शकतो. अधिकाऱ्यांना दिली जाते ट्रेनिंग : भारतीय दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्यातील सायबर सेल आणि सीसीटीएनएस अधिकाऱ्यांसाठी राज्य गुन्हे शाखेच्या मुख्यालयात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. या वेबपोर्टलवर मोबाईल चोरी किंवा हरवल्याची तक्रार कशी नोंदवता येईल आणि तपास यंत्रणा या पोर्टलचा वापर कसा करू शकेल. या संदर्भात प्रशिक्षण सत्र घेण्यात आले.
एक रहस्यमयी जंगल, जेथील झाडांचे लाकूड मानले जाते अशुभ
प्रत्येक जिल्ह्यात ‘CEIR डेस्क’ तयार करणार : माहिती देताना पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, जर तुम्हाला पोर्टलचा वापर कसा करायचा हे माहित नसेल, तर लवकरच मोबाइलशी संबंधित तक्रारींसाठी सीईआयआर डेस्क सुरू केला जाईल. जिथे पोलीस सामान्य जनतेच्या तक्रारी सोडवतील. डेस्कवर नियुक्त कर्मचारी पोर्टलवर आपोआप तक्रार नोंदवतील आणि कॉल मिळाल्यावर फोनच्या मालकाला कळवतील आणि पुढील कारवाई करतील.

News18लोकमत


News18लोकमत

सीईआयआर पोर्टलवर चोरीच्या फोनची तक्रार कशी करावी : 1. सर्वप्रथम, ज्या व्यक्तीचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला असेल, त्याला जवळच्या पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवावा लागेल. 2. तुमच्या दूरसंचार सेवा प्रदात्याकडून हरवलेल्या नंबरसाठी डुप्लिकेट सिम कार्ड मिळवा. 3. सीईआयआर तक्रार ऑनलाइन नोंदणी फॉर्मवर जाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://ceir.gov.in/Request/CeirUserBlockRequestDirect.jsp 4. पोर्टलवर मोबाईल नंबर/IMEI क्रमांक भरून माहिती सबमिट करा. 5. संपर्क साधण्यासाठी मोबाईल नंबर आणि पत्ता प्रविष्ट करा. 6. असे केल्याने भविष्यात हँडसेटला कोणत्याही मोबाइल नेटवर्कमध्ये प्रवेश करण्यापासून अवरोधित करेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *