ट्रेन सुटल्यानंतर 10 मिनिटात दुसऱ्याला दिली जाते तुमची सीट? यावर सरकारने दिलं स्पष्टीकरण – News18 लोकमत

[ad_1]

नवी दिल्ली, 26 जुलै : नुकत्याच आलेल्या काही मीडिया रिपोर्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, रेल्वेने स्टेशन सोडल्यानंतर सीट अलॉटमेंटच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय की, ट्रेनने स्टेशन सोडल्यानंतर जर तुम्ही 10 मिनिटांच्या आत सीटवर पोहोचला नाहीत. तर सीट दुसऱ्या कोणालातरी दिलं जातं. तर पहिले असं मानलं जात होतं की, पुढच्या 2 स्टेशनपर्यंत सीट दुसऱ्या कोणाला देता येत नाही. खरंच रेल्वेने असे काही बदल केले आहेत का? की ही खोटी बातमी आहे? यामागचं सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही प्रेस इंफोर्मेशन ब्यूरोच्या अधिकाऱ्यांसोबत बातचित केली.

News18लोकमत


News18लोकमत

News18 चे विशेष प्रतिनिधी शरद पांडे यांनी PI चे अतिरिक्त महासचिव (अतिरिक्त DG) योगेश बावेजा यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले की, ट्रेन स्टेशनवरून सुटल्यानंतर 10 मिनिटांनी एखाद्याला सीट देणे पूर्णपणे चुकीचे आहे. अधिक माहिती देताना ते म्हणाले की, आता सर्व टीटीईंना हँड हेल्ड टर्मिनल नावाचे नोटपॅड देण्यात आले आहे. या उपकरणामुळे 10 मिनिटांच्या चर्चेबाबत गैरसमज पसरला आहे.
Railway : हे आहे जगातील सर्वात जास्त प्लॅटफॉर्म असणारं रेल्वे स्टेशन! एकाच वेळी उभ्या राहतात 44 ट्रेन
सत्य काय आहे? पूर्वी टीटीई शीटवर पेनने प्रवाशांची उपस्थिती मार्क करत असे. आता ही हजेरी हँडहोल्ड टर्मिनलवरून ऑनलाइन मार्क केली जात आहे. यामध्ये एक सक्ती आहे की, TTE तुमच्या सीटवर पोहोचताच त्याला 10 मिनिटांच्या आत तिथे तुमची उपस्थिती नोंदवावी लागेल. जर तुम्ही 10 मिनिटे तिथे दिसला नाही तर तुमची सीट दुसर्‍याला दिली जाऊ शकते. पण याविषयी बोलताना अधिकाऱ्याने सांगितलं की, याचा ट्रेनने स्टेशन सोडण्याशी काहीही संबंध नाही. ट्रेनने स्टेशन सोडल्यानंतर 20 मिनिटांनी देखील TTE तुमच्या सीटवर पोहोचू शकतो. त्यामुळे 10 व्यतिरिक्त तुम्हाला आणखी 10 मिनिटे मिळतील. TTE साधारणपणे 20 मिनिटे किंवा ट्रेन धावल्यानंतर अर्ध्या तासानंतर सीटवर पोहोचते. अशा परिस्थितीत तुम्ही घाबरून जाण्याची गरज नाही.
Indian railway: देशातील किती ट्रेनमध्ये आहे अ‍ॅक्सीडेंट प्रूफ टेक्नॉलॉजी? पाहा रेल्वेमंत्री काय म्हणाले
अपवाद असू शकतात हे शक्य आहे की, तुमची सीट कोचच्या सुरूवातीला असेल आणि ट्रेन धावण्याच्या काही मिनिटांत TTE तुमच्या सीटवर पोहोचेल, म्हणून तुम्ही त्या वेळी उपस्थित राहणे आवश्यक असेल. तुमच्या सीटवर पोहोचण्यासाठी TTE ला लागणारा वेळ आणि त्या 10 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत तुम्हाला सीटवर पोहोचण्याची संधी मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *