Dangerous trees on the road nashik residents fear

[ad_1]

नाशिक, 18 जून : शहरात बाहेर फिरणंही नागरिकांना अवघड झालंय. कारण, रस्त्यावर कधी कुठलं झाडं अंगावर पडेल आणि तो दिवल आपला शेवटचा ठरेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे नाशिककरांनी बाहेर पडण्याची भीती वाटू लागलीय. त्याच कारण असं आहे की, शहरातील अनेक झाडं (Dangerous trees in Nashik City) ही मोडकळीस आली आहेत. शेकडो वर्षांची जुनी झालेली झाडं (Dangerous trees on the road) वाऱ्याच्या वेग वाढला की, उन्मळून किंवा फांद्या तुटून खाली पडतात आणि एखाद्याचा नाहक जीव जातो. प्रशासनाने योग्य ते उचलली तरच नाशिककरांचा जीव भांड्यात पडेल. वाचा : 
Nashik Special Report : कहाणी ‘ती’ च्या जिद्दीची! उसाचं गुऱ्हाळ चालवून पुरूषांनाही लाजवेल, असं करते कष्ट
स्थानिक नागरिक असे सांगतात की, “रस्त्यावर फिरवं की, न फिरावं, असं वाटत आहे. कारण, कधी कोणतं झाडं अंगावर येईल आणि अपघात घडेल सांगता येत नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रशासन चांगली झाडं कापून नेत आहेत आणि जी धोकादायक झाडं आहे, ती तशीच ठेवत आहेत. आता पावसाळा येणार आहे, वारा जोरात सुरू होईल, त्यामुळे वेळीच रस्त्यावरील धोकादायक झाडे कापण्यात यावीत”, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 2 निष्पाप जीवांचा गेला होता जीव मागील आठवड्यातच सातपूर त्रिंबक रोडवरील आयटीआय सिग्नलजवळ एक भलं मोठं गुलमोहराच झाड रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर कोसळलं. त्यात रिक्षा चालक आणि एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तात्काळ अग्निशमन दल, मनपा कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत या दोन निष्पाप जीवांचा बळी गेलेला होता. या घटनेमुळे नाशिककरांना आता भीती वाटू लागली आहे. रस्त्यावर लहान-मोठी अनेक झाडं पडण्याच्या स्थितीत आहेत. अशी झाडं जर लवकर तोडली, असे अपघात होणार नाहीत. वाचा : 
Nashik leopard attack: घराच्या आवारात बसलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला, पुढे काय घडलं? पाहा थरारक घटनेचा CCTV
महापालिका उपायुक्त काय म्हणतात? या संदर्भात महानगरपालिका उपायुक्त विजयकुमार मुंढे म्हणाले की, “शहरातील धोकादायक झाडांचा आम्ही सर्वे केला आहे. जवळपास 92 झाड ही धोकादायक आढळून आली आहेत. काही झाडांच्या फांद्या तोडण्याची गरज आहे. कारण, विजेचे जे खांब आहेत. त्यांना अडथळा निर्माण होत आहे. काही झाडं लगेच तोडण्याची गरज नाही.  शहरात जर कोणत्या भागात धोकादायक झाडं आढळून आली तर नागरिकांनी परवानगी घेतल्याशिवाय ती झाडं तोडू नये. अन्यथा कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. मनपाची परवानगी घेऊनच झाडांची तोड करावी. तसेच धोकादायक झाड तोडण्याची आम्ही मनपा उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांना परवानगी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *