The son of a cushion laborer from akola scored 92 67 per cent in the 12th exam

[ad_1]

अकोला, 10 जून : बारावीचा नुकताच निकाल लागला. आरएलटी महाविद्यालयात आदित्य सावरकर (Aditya Savarkar) या विद्यार्थ्याने विज्ञान शाखेत 92.67 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. घरची परिस्थिती बेताची असताना जिद्द आणि आत्मविश्वासाने त्यावर मात करून आदित्यने घवघवीत यश प्राप्त केलेले आहे. त्याच्या यशाबद्दल आपण जाणून घेऊया… (Topper in 12th board exams) आदित्य सांगतो की, “बारावीच्या निकालानंतर सर्वात आधी बाबांना फोन केला. मी माझ्या महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवल्याचे आणि 92.67 टक्के मिळाल्याचे सांगितले. वडील फोनवरच भावूक झाले. त्यांना आनंदाचे अश्रू आवरता आले नाही. त्यांना हा आनंद नेमका कसा व्यक्त करावा, हेच कळत नव्हते”, असा आनंदाचा क्षण आदित्य सावरकरने शेअर केला. वाचा : 
Washim : वडिलांचे निधन अन् बारावीचा पेपर, दुहेरी संकटावर मात करत साक्षीच्या यशाने वडीलांना मिळाली खरी आदरांजली
आदित्य मूळचा अमरावती जिल्ह्यातील परतवाड्याचा आहे. त्याच्या परिवारामध्ये आई, बाबा आणि एक बहीण आहे. वडील मजुरीने कुशनची काम करतात. आई ही एका शाळेतमध्ये शिपाई आहे. आदित्यची घरची परिस्थिती तशी नाजूक आहे, अनेकदा त्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. मात्र, अनेकांच्या मदतीने आदित्यला मोलाचं मार्गदशन मिळत गेलं आणि आदित्यचा हा खडतर प्रवास यशस्वी झाला. आदित्यची परिस्थिती नाजूक असल्याने नातेवाईक आणि ओळखीतून वडिलांनी NEET च्या क्लासची व्यवस्था केली. आदित्यची महाविद्याल्याकडूनदेखील फी माफ करण्यात आली. गांवडे कोचिंग क्लासनेसुद्धा त्याला निशुल्क शिकवणी दिली. वाचा : 
Career After 12th: बारावीनंतर पुढे शिकण्याची इच्छा नाहीये? It’s OK.. या क्षेत्रांमध्ये थेट मिळेल नोकरी
परतवाड्यातील प्रा. मुळे यांच्याकडूनसुद्धा त्याला वेळोवेळी प्रेरणा आणि मदत मिळाली. राहण्याची सोय नव्हती तर, अकोल्यातील दादाराव पवार (द्वारकानगरी) यांनी त्याला राहायला खोली दिली. त्यानुसार तो वैद्यकीय शिक्षणाच्या तयारीला लागला आहे. आदित्य सांगतो की, “NEET मध्ये उत्तीर्ण होऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा आहे. कारण, मला डाॅक्टर व्हायचं आहे. डाॅक्टर झाल्यानंतरच आई-वडिलांच्या कष्टाला फळ येईल.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *