What is Back foot No Ball Which Mitchell Starc Bowled in DC vs RR IPL 2025 Super Over Know The ICC Rule

[ad_1]

What is Back foot No Ball IPL 2025: आयपीएल २०२५ मधील पहिला सुपर ओव्हर सामना दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आला. या पहिल्याच सुपर ओव्हर सामन्यात राजस्थानचा दिल्लीने पराभव करत विजयाची नोंद केली. यासह दिल्लीचा संघ सर्वाधिक १० गुणांसह पहिल्या स्थानी आहे. या सामन्यात दिल्ली संघाचा मिचेल स्टार्क गेमचेंजर ठरला. पण सुपर ओव्हर सामन्यात त्याला बॅकफुट नो बॉल देण्यात आला. याचा नेमका नियम काय आहे, जाणून घेऊया.

दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना १८९ धावांचे लक्ष्य दिले होते. तर राजस्थानचा २० षटकांत १८८ धावा करू शकला. अखेरच्या षटकात राजस्थानला विजयासाठी ६ चेंडूत ९ धावांची गरज होती, पण स्टार्कने आपल्या अनुभवाच्या जोरावर उत्कृष्ट गोलंदाजी करत त्या षटकात एकही मोठा फटका खेळण्याची संधी दिली नाही आणि धावसंख्या बरोबरीत राहिल्याने सामना सुपर ओव्हरसाठी गेला.

सुपर ओव्हरमध्ये दिल्लीकडून मिचेल स्टार्क गोलंदाजीसाठी उतरला. या सुपर ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर रियान परागने चौकार लगावला पण, दरम्यान नो बॉलचा सायरन वाजला. यानंतर राजस्थानला फ्री हिट मिळाली. पण संघ या फ्री हिटचा फायदा घेऊ शकला नाही आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात रियान धावबाद झाला. पण हा बॅकफूट नो बॉल काय असतो, जाणून घेऊया.

हेही वाचा

साधारणत: गोलंदाजाने गोलंदाजी करताना जर पिचिंग लाईनच्या पलीकडे पाय ठेवला तर नो बॉल दिला जातो. पण स्टार्कचा पाय तर रेषेवर होता. मात्र त्याचा दुसरा पाय म्हणजेच बॅक फूटमुळे त्याला नो बॉल देण्यात आला. त्याचा मागचा पाय रिटर्न क्रीजच्या लाईनजवळ होता. त्याचा पायाचा काही भाग त्या रिटर्न क्रीजच्या लाईनवर होता. त्यामुळेच पंचांनी त्याला नो बॉल दिलं.

हेही वाचा

पण समालोचक सायमन डुल, जे समालोचन करत होते, त्यांनी पंचांच्या निर्णयावर टीका केली. ते म्हणाले की तो नो-बॉल नसावा. पण नंतर मात्र रिव्ह्यू पाहिल्यानंतर त्यांनी आपली चूक सुधारली आणि म्हणाले की पाय रेषेला स्पर्श करत असेल तर ही पेनल्टी आहे.

हेही वाचा

एमसीसीच्या २१.५.१ च्या नियमानुसार, ‘बॉल टाकल्यानंतर गोलंदाजाचा मागचा पाय रिटर्न क्रीजच्या आतमध्ये असला पाहिजे आणि त्या लाईनला स्पर्श झालेला नसावा. जरी पायाचा लाईन स्पर्श झाला असेल तर तो नो बॉल असेल आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला पुढच्या चेंडूवर फ्री हिट मिळेल. याचा अर्थ असा की पाय त्या रिटर्न लाईनला स्पर्श करताच नो बॉल दिला जाईल आणि स्टार्कच्या पायाचा लाईनला स्पर्श झाला होता हे स्पष्ट आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *