पोलीस असल्याच्या बतावणीने ज्येष्ठांना लुटणारा गजाआड

[ad_1]

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पोलीस असल्याच्या बतावणी ज्येष्ठांना लुटणारा चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट सहाने अटक केली. चोरट्याकडून आठ गुन्हे उघडकीस आले आहे. त्याने शहराच्या वेगवेगळ्या भागासह सासवड परिसरात गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चोरट्याकडून साडेसात लाख रुपयांचे दागिने आणि दुचाकी जप्त करण्यात आले आहेत.

हमीद अफसर खान (वय ३०, रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. पुणे शहर, तसेच परिसरात पादचारी ज्येष्ठ नागरिकांकडे पोलीस असल्याची बतावणी करुन त्यांना लुटण्याचे गुन्हे घडले होते. पोलीस असल्याची बतावणी करुन खान याने ज्येष्ठांकडील दागिने चोरुन नेले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट सहाकडून करण्यात येत होता. ज्येष्ठांना लूटणारा चोरटा हमीद खान हा लोणी काळभोर परिसरातील स्मशानभुमीजवळ येणार असल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला संशयावरुन ताब्यात घेतले.

चौकशीत खान आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराने पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठ नागरिकांना लुटल्याची कबुली दिली. खान आणि साथीदाराने पर्वती, कोथरूड, कोंढवा, सिंहगड रस्ता, भारती विद्यापीठ, तसेच सासवड परिसरात लुटमारीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून सात लाख ६८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि दुचाकी असा आठ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक मदन कांबळे, उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे, नितीन घाडगे, शेखर काटे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती नरवडे यांनी ही कामगिरी केली.

बतावणीला बळी पडू नका

पादचारी ज्येष्ठ नागरिकांकडे बतावणी करुन त्यांच्याकडील ऐवज चोरण्याच्या घटनांमध्ये ‌वाढ झाली आहे. चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करा. बतावणी करणारा चोरटा आढळून आल्यास त्वरीत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस असल्याची बतावणी, तसेच ‘मालकाला मुलगा झाला आहे. ज्येष्ठांना धान्य वाटप, कपडे वाटप करण्यात येत आहे’, अशी बतावणी करुन चोरटे फसवणूक करत असल्याचे उघडकीस आले आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *