टाळ-मृदुंगाच्या गजरात शेगावची पालखी अकोल्यात दाखल, वाचा SPECIAL REPORT – News18 लोकमत

[ad_1]
<span style=“color: #333333; font-family: Georgia, ‘Times New Roman’, ‘Bitstream Charter’, Times, serif;” data-keep-original-tag=“false” data-original-attrs=”{” style”:””}”=””>अकोला 8 जून : कोरोना महामारीमुळे पंढरीची वारी निघाली नव्हती. मात्र, सर्वत्र लसीकरण झाल्यामुळे सर्व काही पूर्ववत होत आहेत. कोरोनामुळे 2 वर्षानंतर गजानन महाराजांची पालखी अकोल्यात दाखल झाली. शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. टाळ मृदुंगच्या गजरामुळे शहरात दाखल झाल्याने भक्तांमध्ये उत्साह आणि आनंदाच वातावरण दिसून आला. शहरामध्ये श्रींच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली होती. या पालखीच्या सोहळ्यानिमित्त अकोला शहरात चौका-चौकात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले जात होते. स्वागतासाठी जागोजागो रांगोळी काढण्यात आली होती. यावेळी वारकऱ्यांना पेयजल व खाद्यपदार्थांचे वाटप देखील होते. वाचा :
Ashadhi Wari 2022 : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी ‘या’ दिवशी पंढरपूरकडे करणार प्रस्थान; यंदाच्या आषाढी वारीचे नियोजन, वाचा सविस्तर
<span style=“color: #333333; font-family: Georgia, ‘Times New Roman’, ‘Bitstream Charter’, Times, serif;” data-keep-original-tag=“false” data-original-attrs=”{” style”:””}”=””>श्रींच्या पालखीचे हे 53 वे वर्ष आहे. श्रींच्या पालखीसोबत यावर्षी 700 वारकरी, 3 अश्व आणि 10 वाहने आहेत. वारकऱ्यांची काळजी घेण्यासाठी एक ॲम्बुलन्स, डॉक्टर आणि इतर सहकारीदेखील आहेत. वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी टँकरचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती.
<span style=“color: #333333; font-family: Georgia, ‘Times New Roman’, ‘Bitstream Charter’, Times, serif;” data-keep-original-tag=“false” data-original-attrs=”{” style”:””}”=””>‘विठूनामाचा गजर आणि गण गण गणात बोते’चा नामघोष करत श्री. संत गजानन महाराजांची पालखी 6 जूनला सोमवारी सकाळी 7 वाजता मोठ्या थाटात विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. 2 वर्षांनंतर हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून हजारो भाविक संतनगरी शेगावमध्ये दाखल झाले होते. श्रींची पालखी श्री शेत्र पंढरपूर येथे 8 जुलैला पोहोचले, अशी माहिती वारकऱ्यांकडून देण्यात आली.
…कसा असेल अकोल्यातील पालखीचा प्रवास?
<span style=“color: #333333; font-family: Georgia, ‘Times New Roman’, ‘Bitstream Charter’, Times, serif;” data-keep-original-tag=“false” data-original-attrs=”{” style”:””}”=””>पहिल्या दिवशी पालखी सकाळी 9 वाजता खंडेलवाल शाळा येथून पुढे कस्तुरबा हॉस्पिटल, विठ्ठल मंदिर, लोखंडी पूल, सिटी कोतवाली, गांधी चौक, मेन राेड, खुले नाट्यगृह, निशांत टॉवरच्या गल्लीतून पुढे जात मुंगीलाल बाजोरिया शाळेत मुकामी असेल. तर उद्या गुरुवारी मुंगीलाल बाजोरीया शाळेतून पोस्ट ऑफिस कार्यालयाजवळून जिल्हाधिकारी निवासस्थानासमोरून, अशोक वाटिका चौक, खंडेलवाल भवनासमोरून नेहरू पार्क मार्गे, जुने इन्कम टॅक्स चौक, आदर्श कॉलनी शाळा क्रं. 16 मध्ये सकाळी 9 ते 12 राहणार असून पुढे सिंधी कॅम्प मार्गे, अशोक वाटिकेमागून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून, सरकारी बगीचा, खोलेश्वर, कोतवाली, श्री राजेश्वर मंदिरासमोरून हरिहर पेठ मुक्कामी राहणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
[ad_2]
Source link