Akola Shahratil Nalesfai Ajunahi Rengatach… Mata Nagar Madheel Ghanich Actual Very shocking…. – News18 लोकमत

[ad_1]

अकोला, 6 जून : शहरातील मातानगर या मोठ्या लोकवस्तीत सोयी-सविधांचा (Basic Facilities) अभाव असल्यामुळे तेथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. या वस्तीमध्ये घाणीचं साम्राज्या पसरलेलं आहे. प्रशासनाकडून तेथील नाल्यांचीदेखील सफाई करण्यात आलेली नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पाणी, वीज प्रश्नांना येथील नागरिकांना सामोरं जावं लागत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांचा सफाई झाली नाही, तर पाणी घरात शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वस्तीतील नागरिक त्रस्त आहे. प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. यासंदर्भात महापालिका उत्तर झोनचे अधिकारी विठ्ठल देवकते सांगतात की, “पालिकेच्या उत्तर झोनमधील मोठ्या नाल्यांची सफाई झाली आहे. पण, छोट्या नाल्यांची सफाई पूर्ण व्हायची आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामेही पूर्ण केली जातील.” वाचा :
आपण सवयीने खोटं बोलतो? की त्यामागं दुसरं काही कारण आहे? संशोधनातून मिळालं उत्तर
दुर्गंधीच्या समस्येला तोंड देणाऱ्या स्थानिक महिला सांगतात की, “इथं वेळवर सफाईचं कामं केली जात नाहीत. त्यात कचऱ्याचा ढीग साठतो. नालेसफाई केली नाही तर पावळ्यात मध्यरात्री घरात पाणी शिरतो. या वस्तीत शौचालयाची दुरावस्था झालेली आहे. त्याचे दरवाजे तुटलेले आहे. दुर्गंधीचे पाणी रस्त्यावर वाहतं आहे. प्रशासनानं पावसाळ्यापूर्वी लक्ष देऊ नालेसफाईचं काम पूर्ण करावं”, अशी विनंती स्थानिक महिलांनी केलेली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *