7 कामे जी चुकूनही सूर्य अस्ताला जाताना करू नयेत, अन्यथा घरात येते गरिबी

[ad_1]

मुंबई, 20 जुलै: खूप प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर काही धार्मिक उपाय जरूर करून पाहावेत. धार्मिक मान्यतांनुसार, हे उपाय केल्याने तुम्हाला आयुष्यभर पैशांची उणीव भासणार नाही. गरिबीपासून दूर राहण्यासाठी या 7 गोष्टींपासून नेहमी दूर राहिले पाहिजे, अशी मान्यता आहे.

News18लोकमत


News18लोकमत

उंबरठा सूर्यास्ताच्या वेळी घराच्या किंवा दुकानाच्या उंबरठ्यावर उभे राहून बोलू नका. तसेच व्यवहारांबद्दल बोलू नका. यावेळी दान करणे टाळा सूर्यास्ताच्या वेळी कोणालाही दान देऊ नका, ते कितीही महत्त्वाचे असले तरीही देऊ नका, असे शास्त्र सांगते. या काळात दुध, दही, तूप, रुपये किंवा पैसे इतरांना दान करू नका. या 3 राशींचे उजळणार नशीब, 25 जुलैला बुध ग्रहाचे सिंह राशीत संक्रमण शारीरिक संबंध टाळा सूर्यास्ताच्या वेळी चुकूनही शारीरिक संबंध करणे टाळा. या काळाला गो धुली बेला म्हणतात. पूजा करण्याची किंवा दिवा लावण्याची ही वेळ आहे. केस धुवू नका किंवा मेकअप करू नका गो धुली बेलाच्या वेळी कितीही महत्त्वाचे असले तरी महिलांनी केस धुवू नयेत किंवा स्वत:ला सजवू नये. शक्य असल्यास पूजेत वेळ घालवावा, अशी मान्यता आहे. Shravan 2023: अधिक मासाला सुरुवात, कोणत्या गोष्टींची घ्यावी काळजी, राशीनुसार काय दान करावे कपडे धुवू नका सूर्यास्तानंतर कपडे कधीही धुवू नयेत. काही अडचणींमुळे ते धुवावे लागलेच तरी चुकूनही बाहेर वाळवू नका. अंघोळ, झाडून काढणे, अंत्यसंस्कार वर्ज्य सूर्यास्तानंतर अंघोळ, झाडून काढणे, अंत्यसंस्कार करण्यास मनाई आहे. त्याचा उल्लेख पुराणात आढळतो. या वेळी झाडांना स्पर्शही करू नये. चाणक्य नीतीनुसार या 5 ठिकाणी क्षणभरही थांबू नये, संकटांना द्याल आमंत्रण रात्री केस कापणे, मुंडण करणे शुभ नाही धार्मिक मान्यतांनुसार, रात्रीच्या वेळी केस कापणे किंवा मुंडण करणे कोणत्याही व्यक्तीसाठी शुभ नाही. असे केल्याने व्यक्तीवर नकारात्मक ऊर्जा प्रभावी होते आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला गरिबीचाही सामना करावा लागू शकतो, अशीही धार्मिक मान्यता आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *