IRCTC ने आणलंय खास दिव्य दक्षिण यात्रा टूर पॅकेज! कमी पैशांत होईल देवदर्शन

[ad_1]

मुंबई, 20 जुलै :  IRCTC ने प्रवाशांसाठी दिव्य दक्षिण यात्रा टूर पॅकेज आणले आहे. ‘देखो अपना देश’ अंतर्गत हे टूर पॅकेज सुरू करण्यात आले आहे. या टूर पॅकेजमध्ये पर्यटक भारत गौरव टुरिस्ट ट्रेनने प्रवास करतील. IRCTC चे हे टूर पॅकेज 8 रात्र आणि 9 दिवसांचे आहे. या टूर पॅकेजचा प्रवास सिकंदराबाद येथून सुरू होणार आहे. IRCTC च्या या टूर पॅकेजचे नाव दिव्य दक्षिण यात्रा विद ज्योतिर्लिंग आहे. या टूर पॅकेजमध्ये तुम्ही अरुणाचल, कन्याकुमारी, मदुराई, रामेश्वरम, त्रिची आणि त्रिवेंद्रमला भेट द्याल. हे टूर पॅकेज 8 ऑगस्टपासून सुरू होणार आहे IRCTC चे हे टूर पॅकेज 8 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या टूर पॅकेजमध्ये एकूण 716 जागा आहेत. या टूर पॅकेजमध्ये, प्रवासी सिकंदराबाद, काझीपेट, वारंगल, खम्मम, विजयवाडा, तेनाली, ओंगोले, नेल्लोर, गुडूर आणि रेनिगुंटा येथे बोर्डिंग आणि डिबोर्डिंग करु शकतील.
IRCTC: स्पेशल रॉयल राजस्थान टूर पॅकेज, 11 दिवसात करुन या 8 प्रसिद्ध ठिकाणांची सैर!
IRCTC च्या या टूर पॅकेजचे भाडे IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये वेगवेगळ्या कॅटेगिरीमध्ये वेगवेगळे भाडे आहे. तुम्ही इकॉनॉमी क्लासमध्ये डबल किंवा ट्रिपल शेअरिंगवर प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 14,300 रुपये भाडे द्यावे लागेल. दुसरीकडे, जर तुम्ही स्टँडर्ड कॅटेगिरीमध्ये डबल किंवा ट्रिपल शेअरिंग करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 21,900 रुपये द्यावे लागतील. तर, तुम्ही कंफर्ट क्लासमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 28,500 रुपये मोजावे लागतील.
IRCTC चं जबरदस्त टूर पॅकेज! कमी पैशांत फिरुन या अंदमान
5 ते 11 वर्षे वयोगटातील मुले तुमच्यासोबत प्रवास करत असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी इकॉनॉमी क्लाससाठी 13,300 रुपये, स्टँडर्ड क्लाससाठी 20,800 रुपये आणि कंफर्ट क्लाससाठी 27,100 रुपये मोजावे लागतील. या टूर पॅकेजमध्ये रेल्वे प्रवाशांच्या राहण्याची आणि जेवणाची मोफत व्यवस्था करणार आहे. हे टूर पॅकेज बुक करण्यासाठी पर्यटक आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना तिरुवन्नमलाई येथील अरुणाचलम मंदिराला भेट देता येईल. रामेश्वरममध्ये रामनाथस्वामी मंदिरात जातील आणि मदुराईमध्ये यात्रेकरू मीनाक्षी अम्मन मंदिराला भेट देतील. पर्यटक रॉक मेमोरियल, कन्याकुमारीतील कुमारी अम्मान मंदिर आणि त्रिवेंद्रममधील श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट देतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *