Netflix चा पासवर्ड शेअर करता येणार नाही, कंपनीने भारतीयांसाठी घेतला मोठा निर्णय – News18 लोकमत

[ad_1]

मुंबई : तुम्ही नेटफ्लिक्स वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. नेटफ्लिक्स वापरणाऱ्यांना आता आपला पासवर्ड शेअर करता येणार नाही. कंपनीने भारतीयांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला एकमेकांना पासवर्ड शेअर करता येणार नाहीत. कंपनीकडून यासंदर्भात ई मेल पाठवला जाईल असंही सांगण्यात आलं आहे. आम्हाला माहिती आहे की युजर्सकडे सध्या अनेक मनोरंजनाचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कंटेट देण्यासाठी प्रयत्नशील असतो. एवढंच नाही तर नेटफ्लिक्स पाहणाऱ्यांना त्या कंटेटमधून समाधान मिळत असतं असा दावा कंपनीने केला आहे. नेटफ्लिक्सचं अकाउंट एकाच कुटुंबापुरतं मर्यादीत आहे. याशिवाय आणखी व्यक्ती जर तो पासवर्ड वापरुन पाहात असेल तर त्याला या पुढे परवानगी दिली जाणार नाही. याआधी भारताबाहेर नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअरिंगवर बंदी घातली होती. त्यानंतरही कंपनी फायद्यामध्ये असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तर गेल्या काही काळात नेटफ्लिक्सचे युजर्सही वाढले आहेत.

News18लोकमत


News18लोकमत

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार एक खाते फक्त एका घरात वापरलं जावं. घरातील प्रत्येकजण नेटफ्लिक्स वापरू शकतो. तुम्ही जेव्हा घराबाहेर किंवा सुट्टीवर असता तेव्हा प्रोफाइल ट्रान्सफर करणे आणि प्रवेश आणि डिव्हाइसेस व्यवस्थापित करणे यासारख्या नवीन वैशिष्ट्यांचा लाभ घेऊ शकता.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *