खाजगी नोकरीत मन नाही लागले, सुरू केलं pizza दुकान, होतेय जोरदार कमाई

[ad_1]

प्रवीण मिश्रा, प्रतिनिधी खंडवा, 22 जून : सध्या अनेकांचा ओढा हा नोकरीच्या तुलनेत व्यवसायाकडे दिसतो आहे. अनेक जण खासगी नोकरीत मन नाही लागत किंवा तितक्या पगारात भागत नाही म्हणून नोकरीच्या तुलनेत स्टार्टअप सुरू करून अनेकांनी चांगली मजलही मारली आहे. आज आपण अशाच एका तरुणाचा प्रवास जाणून घेणार आहोत. रोहित फरकले असे या तरुणाचे नाव आहे. त्याने एक पिझ्झाचे दुकान सुरू केले आहे. तसेच या दुकानाचे नाव त्याने खराब Pizza.com असे ठेवले आहे. या दुकानात फास्ट फूडचे शौकीन आले की त्यांना हे नाव वाचून धक्काच बसतो. पण येथील पिझ्झा हा लोकप्रिय होत आहे.

News18लोकमत


News18लोकमत

खंडव्यातील रोहित फरकले याने मोबाईल पिझ्झा व्हॅन तयार केली आहे. या व्हॅनमध्ये चविष्ट पिझ्झा तयार केला जातो आणि तो फास्टफूड प्रेमींना पसंद पडत आहे. रोहितची ही मोबाईल व्हॅन सध्या शहरातील पॉश एरिया, आनंद नगर परिसरात लावण्यात आली आहे. त्याला खवैय्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोहित काय म्हणाला – याबाबत रोहित म्हणाला की, मी टायर शोरूममध्ये मॅनेजर म्हणून काम करायचो. त्यानंतर मी मार्केटिंग क्षेत्रातही काम केले मात्र, स्वतःचे काहीतरी काम असावे, असे मला खासगी नोकरी केल्यावर लक्षात आले. म्हणूनच मी सन्मानाने काम करायचे ठरवले. तसेच “खराब Pizza.com” नावाने पिझ्झा स्टॉल लावायला सुरुवात केली. चांगल्या किंवा वाईट अशा दोनच गोष्टी आहेत. खराब असे नाव देऊन काहीतरी चांगलं देण्याचा मी विचार केला, असे या दुकानाच्या नावारुन तो म्हणाला. आमचा पिझ्झा खाऊन लोक इथे वारंवार येतात, अशी माहिती त्याने दिली. तर पिझ्झासोबतच आम्ही लोकांना चविष्ट बर्गरदेखील देतो, असे त्याने सांगितले. आमच्याकडे 49 रुपयांपासून ते 250 रुपयांपर्यंतचे पदार्थ मिळतात. हा पिझ्झा शॉप कुठेही लावला जाऊ शकतो. यामुळे रोहितची दरमहा खूप बचतही होते, असे त्याने सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *